27.7 C
Mumbai
Sunday, July 13, 2025
घरविशेषबीएसएफ, लष्कराकडून घुसखोरीचा प्रयत्न उधळला

बीएसएफ, लष्कराकडून घुसखोरीचा प्रयत्न उधळला

पाकिस्तानी गाइड जेरबंद

Google News Follow

Related

जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील तारकुंडी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) आणि भारतीय लष्कराने एकत्रित ऑपरेशनमध्ये हाणून पाडला आहे. या कारवाईत सीमेवरून एक पाकिस्तानी गाइडला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या चार सशस्त्र दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात होता. सतर्क भारतीय जवानांनी वेळीच कारवाई करत घुसखोरी रोखली आणि गाइडला पकडलं.

पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून मोबाइल फोन, पाकिस्तानी चलन आणि इतर संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत हा पाकिस्तानी नागरिक सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात असून, सीमा पारच्या दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या हँडलर्सबाबत चौकशी सुरू आहे. एलओसीवर देखरेख वाढवण्यात आली असून भविष्यातील घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा..

पुण्याच्या लोणी स्टेशन परिसरात झळकले इराणच्या खामेनींचे बॅनर, झेंडे!

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याबाबत मोठा निर्णय

नेल्लई मंदिराच्या संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती गठीत

फॅक्टरी स्फोट : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

ही घटना अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर घडली आहे, जिथे बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे. सुरक्षा यंत्रणांना पाकिस्तानकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा डाव असल्याचे इनपुट मिळाले आहेत. त्यामुळे सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. बीएसएफने भारत-पाक सीमा भागात मानवी तैनातीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर सुरू केला आहे. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होत असून ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डच्या माहितीनुसार, यात्रेची अंतिम तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा