उत्तर प्रदेशातील बरेली शहरात आज (१० ऑक्टोबर) जुम्मा नमाजच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शहरात उच्चस्तरीय अलर्ट जारी केला आहे. ४५०० हून अधिक पोलीस कर्मचारी, ४ एसएसपी, ४ सीओ, ४० पोलीस निरीक्षक आणि २० महिला पथकं शहरात तैनात करण्यात आली आहेत.
शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ‘सेक्टर स्कीम’ लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत पोलिस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. सर्व प्रमुख धार्मिक स्थळांभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
८५ दंगेखोर अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत ८५ संभाव्य दंगेखोरांना अटक केली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. परिस्थितीवर कंट्रोल रूममधून सतत नजर ठेवण्यात येत आहे. शहरात वरिष्ठ अधिकारी गस्त घालत असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा :
फिलीपिन्समध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप!
बुरखा परिधान केल्यास भरा लाखोंचा दंड! इटलीच्या संसदेत विधेयक
आयपीएस वाय पूरन कुमार आत्महत्या प्रकरणी हरियाणाच्या दोन वरिष्ठ पोलिसांविरुद्ध गुन्हा
एक्सरसाइज केल्यानंतरही वजन कमी होत नसेल?
एसएसपी अनुराग आर्य यांचा इशारा
बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) अनुराग आर्य यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचार्यांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. “शहरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोणतीही गडबड सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.







