फिलीपिन्सच्या मिंडानाओ प्रदेशात ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र सुमारे २० किलोमीटर खोलवर होते. भूकंपानंतर, स्थानिक भूकंपशास्त्रीय संस्थेने, फिव्होलक्सने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना तात्काळ उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने म्हटले आहे की भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावर धोकादायक लाटा येऊ शकतात. दरम्यान, सध्या जीवितहानी किंवा नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने म्हटले आहे की भूकंपाच्या केंद्रापासून १८६ मैलांच्या आत धोकादायक लाटा येऊ शकतात.
फिलीपिन्सच्या किनाऱ्यावरील काही भागात ३ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, तर इंडोनेशिया आणि पलाऊमध्ये लहान लाटा येण्याची शक्यता आहे. दक्षिण फिलीपिन्स प्रांत दावाओ ओरिएंटलचे गव्हर्नर म्हणाले की, भूकंप झाला तेव्हा लोक घाबरले होते. काही इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत.
हे ही वाचा :
बुरखा परिधान केल्यास भरा लाखोंचा दंड! इटलीच्या संसदेत विधेयक
पाकिस्तानला नवीन प्रगत एअर-टू-एअर क्षेपणास्त्रे मिळणार नाहीत!
सहा महिन्यांखालील बाळांमध्ये नव्या प्रकारच्या डायबिटीज
टागम सिटी दावओ हॉस्पिटलमधील एका व्हिडिओमध्ये रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले, ते भूकंपाच्या धक्क्यांमध्ये जीव वाचवण्यासाठी धावताना दिसून आले. दरम्यान, यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी झालेल्या भूकंपाने फिलीपिन्समध्ये प्रचंड हादरा बसला होता, ज्यामध्ये ७२ लोक मृत्युमुखी पडले होते आणि जवळजवळ ३०० जण जखमी झाले होते.







