31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!

भाजपच्या कार्यकर्त्याचा प्रताप, व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते निलेश कराळे यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्याकडून ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

वर्ध्याच्या उमरी येथे शरद पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली आणि याचे रुपांतर मारहाणीत झाले. बूथवर कशाला आला, असा जाब विचारत निलेश कराळे यांना मारहाण करण्यात आली. यावेळी दोन्ही गट समोरा-समोर आले. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा : 

बिटकॉइन घोटाळा: सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलेल्या गौरव मेहताच्या घरी ईडीकडून धाड

संभलची जामा मशीद हरिहर मंदिर असल्याचा दावा; न्यायालयाने दिले सर्वेक्षणाचे आदेश

हर्षित माहिमकर, प्रिशा शाहला दुहेरी मुकुट

सोलापुरात ठाकरेंना दणका देत काँग्रेसची पलटी; ऐन मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवाराला पाठींबा

दरम्यान, निलेश कराळे हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना शिकवण्याचे काम करतात, कराळे सर म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, अचानकपणे त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. तसेच त्यांनी लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. यानंतर त्यांनी प्रवक्त्याची जबाबदारी स्वीकारली, लोकसभेसाठी त्यांनी पक्षाचा प्रचार केला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा