25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरसंपादकीयवांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास...

वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…

Google News Follow

Related

प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत एक ऑडियो क्लीप व्हायरल झालेली आहे. त्यात एका महिलेचा आवाज आहे. ‘निवडणुकांसाठी पैशाची गरज आहे, सध्या बिटकॉईनला चांगला भाव आहे, त्यामुळे बिटकॉईन विकत का नाहीस? असा सवाल ही महिला अज्ञात व्यक्तिला करीत आहेत. हा आवाज राष्ट्रवादी शपच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा आहे, असा दावा केला जातो आहे. ही ऑडियो क्लीप व्हायरल झाल्यानंतर भाजपाने या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांना काही सवाल केले. त्यानंतर अर्थातच सुप्रिया सुळे यांनी हात झटकले आहेत. त्यांचे पूजनीय पिताश्री शरद पवार यांनी तर म्हटलंय, ‘तुरुंगात गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या आरोपावर काय बोलायचे ?’ हेच पवार तुरुंगात गेलेल्या अनिल देशमुखांच्या आरोपांवर मात्र चटकन विश्वास ठेवतात, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून महायुती सरकारवर शरसंधानही करतात. बीटकॉईनचे प्रकरण सोपे दिसत नाही, यात सुळे यांच्यासह पवार कुटुंबाशी घट्ट संबंध असलेल्या अमिताभ गुप्ता यांचेही नाव समोर येते आहे.

तुरुंगात गेलेल्या ज्या अधिकाऱ्याबद्दल पवार बोलतायत ते पोलिस अधिकारी आहेत, माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील. २०१८ मध्ये एक बिटकॉईन घोटाळ्याची फॉरेन्सिक चौकशी करण्यासाठी रवींद्रनाथ यांच्या केपीएमजी यांची कंपनीची नियुक्ती करण्यात आली. याच प्रकरणात २०२२ मध्ये धक्कादायक वळण आले. रवींद्रनाथ यांना याप्रकरणात सहआरोपी बनवून अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडीटर म्हणून ज्या गौरव महेता यांनी साक्ष
दिली होती, त्यांनीच या प्रकरणाचा भांडाफोड केलेला असल्याचा दावा रवींद्रनाथ यांनी केलेला आहे.

महेता यांनी सिग्नल एपवर रवींद्रनाथ यांच्याशी संवाद साधला आहे. एका अशा अधिकाऱ्याशी तो बोलत होता, ज्याला अडकवण्याच्या कटात कदाचित तोही सहभागी होता. पैशावरून काही वाद निर्माण झाल्यामुळे कदाचित महेता हा गौप्यस्फोट करत असल्याची शक्यता आहे. हा संवाद एकदम सनसनाटी आहे. ‘अमित भारद्वाज नामक एका व्यक्तिचे बिटकॉईन वॉलेट गायब झाले. ते पुण्याचे तत्कालीन पोलिस आय़ुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याचा छडा लावला. परंतु हे मूळ वॉलेट नव्हते. ते बदलण्यात आले होते. त्या वॉलेटमधील क्रिप्टो करन्सीची अनेकदा खरेदी विक्री झाली.’

हे ही वाचा:

हर्षित माहिमकर, प्रिशा शाहला दुहेरी मुकुट

चेन्नईत बीएमडब्ल्यूच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!

विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

गौरव महेताच्या एका ऑडियो क्लीपमध्ये तो असा दावा करतो की, ‘पाटील आणि घोडे या दोन व्यक्तिच्या नावावर आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर क्रिप्टो करन्सीची चार खाती उघडण्यात आली. त्यात व्यवहार झाले. उद्या जर त्या खात्याची
चौकशी झाली तर तुरुंगात ते जातील, कर्तेकरविते बाहरे राहतील अशी सगळी तजवीज करण्यात आली. या वॉलेटमधील करन्सी लोकसभा आणि विद्यमान विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आली.’ गौरव महेता याने नाना पटोले, सुप्रिया सुळे, अमिताभ गुप्ता, डीसीपी भाग्यश्री नवटाके, गौरव महेता यांच्या ऑडीयो क्लीप रवींद्रनाथ यांना पाठवल्या. या सगळ्या क्लीप सिग्नल एपवर पाठवण्यात आल्या होत्या.

यात ज्या अमिताभ गुप्ता यांचा उल्लेख करण्यात येतो आहे त्यांचे नाव कोविडच्या काळातही गाजले होते. लॉकडाऊनच्या काळात हवाला प्रकरणात आरोपी असलेल्या वाधवान बंधुंची महाबळेश्वरात पाठवणी करण्याच्या प्रकरणात गृहखात्याचे तत्कालीन प्रधान सचिव असलेल्या अमिताभ गुप्ता यांचे नाव आले होते. त्यांची चौकशी झाली होती. पुढे त्यांना मविआ सरकारने पुण्याच्या पोलिस आय़ुक्त पदाची बक्षीसीही दिली होती. त्यावरून वाधवान कुटुंबियांवर मविआतील कोणाची कृपा
होती, याचा अंदाज महाराष्ट्राच्या जनतेला आला होता. त्याच अमिताभ गुप्ता यांचे नाव आता एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने या बिटकॉईन प्रकरणात घेतले आहे.

महेता याने रवींद्रनाथ यांना पाठवलेल्या ऑडीओ क्लीपमध्ये गुप्ता यांच्या तोंडी ‘५० कोटीचे बिटकॉईन विका, १०० कोटींचे बिटकॉईन विका’ अशा प्रकारचे संवाद आहेत. अजूनही त्या खात्यात कोट्यवधी रुपये किमतीचे बिटकॉईन आहेत, असा दावा हा महेता करतो आहे. हे प्रकरण गंभीर असून त्याची चौकशी होण्याची गरज आहे. कारण जगभरात घातपाती कारवाया, दहशतवादी कारवाया आणि दोन नंबरच्या धंद्यासाठी बिटकॉईनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हे उघड
सत्य आहे. त्यामुळे भारतात बिटकॉईनमध्ये कोणत्या नेत्याचा कोट्यवधींचा काळा पैसा गुतंला आहे? निवडणुकीच्या काळात तो भारतीय चलनाच्या रुपात कसा रुपांतरीत करण्यात आला? निवडणुकीत कसा वापरण्यात आला? याचा खुलासा होऊ शकेल.

रवींद्रनाथ यांनी या प्रकरणात १४ महिन्यांची सजा भोगली. त्यांना ही शिक्षा ज्यांच्या साक्षीमुळे झाले तो गौरव महेता त्यांना ही सगळी अंडीपिल्ली एका एपवर पाठवतो याचा अर्थ उघड आहे. सुरूवातीला रवींद्रनाथ यांचा बकरा करण्यात आला, पुढे आपला बळी दिला जाईल अशी भीती त्याला वाटली असण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना त्यांनी काही सवाल विचारले आहेत. त्यांच्यावर अब्रुनुसकानीचा दावा करण्याची भाषा सुप्रिया सुळे करतायत. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे रवींद्रनाथ यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभे करून हात झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवार यांनी मात्र त्या ऑडियो क्लीपमध्ये ऐकू येणारा आवाज सुप्रिया यांचा असावा असा दावा केलेला आहे.

बिटकॉईनचे व्यवहार सिद्ध करणे कठीण असते, परंतु अशक्य नाही. ऑडियो क्लीपची सत्यासत्यता सिद्ध होऊ शकते. गौरव महेता याने हे सगळे गौप्यस्फोट केलेले आहे. ज्या लोकांची महेता यांनी नावे घेतली आहेत, त्यात पाटील आणि घोडे यांच्यासारखे असे लोक आहेत, ज्यांच्या नावे बिटकॉईनची खाती उघडण्यात आली. त्यांच्या जीविताची काळजी घेणे. त्यांना सुरक्षा प्रदान करणे महत्वाचे ठरले. विनोद तावडेंवर पाच कोटी वाटल्याचे आरोप झाल्यानंतर मविआतील तमाम नेत्यांना हर्षवायू झाला होता. मुळात हे सगळे प्रकरण म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशा प्रकारचे होते. तरीही मविआचे सगळे नेते प्रतिक्रिया देत सुटले होते. बिटकॉईन प्रकरणाचा धूमधडाका इतका मोठा आहे. याबाबत आता मविआचे नेते किती तोंड उघडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा