30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
घरविशेषलसीकरण प्रमाणपत्राच्या तपासणीमुळे बस प्रवासी वैतागले

लसीकरण प्रमाणपत्राच्या तपासणीमुळे बस प्रवासी वैतागले

Google News Follow

Related

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक महामंडळाने शहरातील २७ बस डेपोमध्ये प्रवाशांचे बसमध्ये चढण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र तपासायला सांगितले आहे. हा नियम अनेक बस स्थानकांमध्ये अंमलात आणण्यात आला, पण प्रवासी आणि बस चालक या नियमामुळे चांगलेच वैतागले आहेत.

लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यासाठी बस डेपो आणि बस थांब्यावर होणारी गर्दी , लांबलचक रांगा आणि त्यामुळे बस चालवण्यास होणार विलंब. अशा अडचणींना प्रवाशी आणि बस चालकाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारने शनिवारी केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना सार्वजानिक वाहतुकीने प्रवास करण्याची परवानगी देणारा आदेश जारी केला.

बस चालक, काळ्या आणि पिवळ्या टॅक्सी चालकांनी या आदेशाबद्दल म्हणाले, ‘लॉकडाऊन दरम्यान बरेच नुकसान झाले आहे, आता केवळ लसीकरण केलेल्या प्रवाशांना परवानगी दिली तर आम्हाला परवडणार नाही.’ बेस्टने सरकारचा आदेश आपल्या बस डेपोंना पाठवला. तथापि, काही कंडक्टर आणि बस चालकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले ‘ सर्व प्रवाशांची तपासणी करणे केवळ अशक्य आहे. प्रवाशांचे लसप्रमाणपत्र तपासणे आणि परवानगी देणे यामुळे बस थांब्यावर लांबच लांब रांगा लागतील.’

हे ही वाचा:

पत्रकारांवर चीनचे सरकार अशी ठेवणार पाळत

पराग अगरवाल यांना मिळणार वर्षाचा पगार १० लाख डॉलर

युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा

शिवसेनेच्या नेत्याने सांगितले म्हणून हॉटेल पाडले

 

हा नियम अंमलात आणायचा असेल तर सरकारला यंत्रणा अजून विकसित करण्याची गरज असल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे. त्यावर बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, ‘ आम्ही लसीची प्रमाणपत्रे कशी तपासली जातील याची एक प्रक्रिया विकसित करू.’

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा