25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरविशेषकुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांनी २४ तासांत राजीनामा द्यावा!

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांनी २४ तासांत राजीनामा द्यावा!

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी खेळाडूंची चर्चा, मग निर्णय

Google News Follow

Related

क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे. येत्या २४ तासांत त्यांनी राजीनामा द्यावी असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांशी चर्चा केल्यानंतर ही सूचना केली. बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक, रवी दहिया यांच्यासह अनेक कुस्तीगीरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आणि गैरवर्तनाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

बृजभूषण शरण सिंह यांच्याप्रमाणेच काही प्रशिक्षक हे खेळाडूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा हा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. या खेळाडूंनी कुस्ती महासंघाची कार्यकारिणीही बरखास्त करण्याची मागणी केली. कुस्तीगीरांना म्हटले होते की, यात कोणतेही राजकारण नाही तर कुस्तीला वाचविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले.

हे ही वाचा:

आम्ही विश्वास ठेवण्यायोग्य शेजारी आहोत; श्रीलंकेला भारताने केले आश्वस्त

‘घटनाबाह्य’ कार्यक्रमांची आमंत्रणं हवीत कशाला?

ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा व्ही.पी.सिंह केला…

अंधारेबाईंचा ‘अगरबत्ती’वाल्यांवर प्रहार

२२ जानेवारीला बृजभूषण हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीची आणि महासभेची तातडीची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर ते राजीनामा देऊ शकतील.

बृजभूषण यांनी म्हटले आहे की, जर माझ्याविरोधात त्यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी जो जगजाहीर करावा. जर तसे आरोप सिद्ध झाले तर मी स्वतःला फाशी लावून घेईन. मी गेली १० वर्षे महासंघाचा अध्यक्ष आहे. २००८पासून मी कुस्तीशी संबंधित आहे.

एवढेच नाही तर माझ्याविरोधात एफआयआर करावा मी अगदी सीबीआयच्या चौकशीलाही सामोरे जायला तयार आहे.

विनेश फोगाटने त्याआधी असे म्हटले होते की, अशा १०-२० घटना मला माहीत आहेत, ज्यात लैंगिक शोषण झाले आहे. त्यात अनेक प्रशिक्षक आणि पंचही गुंतलेले आहेत. जेव्हा हे सगळे प्रकरण न्यायालयात जाईल तेव्हा आम्ही त्याचे पुरावे देऊ. आम्ही हे सगळे पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देऊ. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. तोपर्यंत कोणताही खेळाडू स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा