दिल्लीच्या पटपडगंज विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी शुक्रवारी (१६ मे ) खिचरीपूर परिसरात चालणारे एक बेटिंग सेंटर पाडण्यासाठी बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले. वृत्तानुसार, गुरुवारी तपासणी दरम्यान, आमदार रवींद्र सिंग नेगी यांना खिचरीपूर परिसरात पीडब्ल्यूडी नाल्यावर बांधलेल्या झोपडीत सट्टेबाजीचा अड्डा सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि ऑपरेटरला पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्यानंतर आज आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी प्रशासनाला झोपडीवर बुलडोझर चालवण्याचे निर्देश दिले. कारवाई दरम्यान, ते स्वतः उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, खिचडीपूर परिसरातील पीडब्ल्यूडी नाल्यावर हे बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आले होते. त्या झोपडीत अनेक वर्षांपासून एक जुगार अड्डा चालू होता. खिचडीपूर परिसराला भेट दिली तेव्हा एका झोपडीत सट्टेबाजीचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याबाबत ताबडतोब पोलिसांकडे तक्रार केली. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी ऑपरेटरला ताब्यात घेतले.
ते पुढे म्हणाले, मतदारसंघात ड्रग्जचा व्यापार करू देणार नाही. जर कोणी बेकायदेशीर काम करेल तर त्याच्यावर देखील अशीच बुलडोझरची कारवाई केली जाईल. बेकायदेशीर ड्रग्ज आणि जुगाराच्या व्यापारामुळे परिसरातील तरुण उद्ध्वस्त होत आहेत. त्याच्या व्यसनामुळे त्यांची घरेही उद्ध्वस्त होत चालली आहेत. परिसरातील बेकायदेशीर ड्रग्ज व्यापारावर कारवाई करणे हे पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
संजय राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील!
‘पाकिस्तानच्या भोलारी एअर बेसवर चार ब्रह्मोस पडली, AWACS विमान मोडून पडलं!’
मेहबुबा मुफ्ती सीमेपलिकडे बसलेल्यांना का खुश करत आहेत?
पाकिस्तानविरुद्ध आणखी एक ‘ऑपरेशन’; सर्वपक्षीय खासदार परदेश दौऱ्यावर जाणार
ते म्हणाले, मतदारसंघातील शशी गार्डनमध्येही ड्रग्जचा व्यापार उघडपणे चालत असे, परंतु आमच्या प्रयत्नांमुळे नियंत्रणात आहे. पटपरगंज विधानसभा मतदारसंघातील ड्रग्ज व्यापार संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी म्हटले.
