‘स्वरागातला नर्क’ या पुस्तकावरून उबाठा खासदार संजय राऊतांवर महायुतीच्या नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे. राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटले होते. तर कादंबऱ्या वाचणे कधीच सोडलंय, बालवाड्मय वाचायचं माझं वय नाही, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. याच दरम्यान, भाजपा मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊतांचे हे पुस्तक अर्ध-अपुरे असून पूर्ण पुस्तक लिहिले असते तर उद्धव ठाकरेंनी त्यांना नरकात पाठवले असते, असे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत.
मंत्री नितेश राणे म्हणाले, पुस्तकामध्ये काही पाने कदाचित लिहायची राहिली असतील. संजय राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाना ज्या-ज्या शिव्या दिल्या आहेत, जी-जी नावे दिली आहेत. त्याचा उल्लेख कदाचित पुस्तकामध्ये करायचे ते विसरले आहेत.
संजय राऊत यांनी ज्यांच्या समोर शिव्या दिल्या, तुरुंगात असताना ते दुसऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंची लायकी काढायची त्या लोकांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली होती. एवढी हिम्मत असेल तर त्या माहितीचा उल्लेख पुस्तकात करून दाखवावा.
हे ही वाचा :
‘पाकिस्तानच्या भोलारी एअर बेसवर चार ब्रह्मोस पडली, AWACS विमान मोडून पडलं!’
मेहबुबा मुफ्ती सीमेपलिकडे बसलेल्यांना का खुश करत आहेत?
पाकिस्तानविरुद्ध आणखी एक ‘ऑपरेशन’; सर्वपक्षीय खासदार परदेश दौऱ्यावर जाणार
“पाक सध्या प्रोबेशनवर; वर्तन सुधारल्यास ठीक अन्यथा कठोर शिक्षा देणार!”
ते पुढे म्हणाले, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर नुसतं प्रेम कशाला दाखवताय. उद्धव ठाकरेंची पात्रता, कुटुंबाला शिव्या, ह्याला पोहचून दाखवतो, एवढ्या पर्यंत बोलण्याची मजाल संजय राऊत यांची गेली होती. हे सर्व त्या पुस्तकामध्ये का लिहिले नाही. असे अर्ध-अपुरे पुस्तक लिहू नये तर पूर्ण पुस्तक काढावे, म्हणजे संजय राऊत यांना नरकात पोहोचवण्याचे काम उद्धव ठाकरेच करतील.
