राजस्थानमध्ये नसीब चौधरीचे बेकायदा अतिक्रमण भजनलाल सरकारने बुलडोजर लावून पाडले आहे. जयपूरमध्ये रा. स्व. संघाच्या खीर वितरण कार्यक्रमामध्ये चौधरीने चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर चौधरीच्या अनधिकृत घरावर बुलडोजरची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई करण्यापूर्वी नसीब चौधरीच्या घरावर नोटीस सुद्धा चिटकवली होती. जयपूर विकास प्राधिकरणाकडून ही नोटीस देण्यात आली होती. नोटीस दिल्यानंतर प्राधिकरणाकडून बुलडोजरची कारवाई करण्यात आली.
हेही वाचा..
नागपूरमधून फडणवीस, कांदिवली पूर्वमधून भातखळकर तर मुलुंडमधून मिहीर कोटेचा
भगवा दहशतवाद’ शब्द वापरणे ही चूक होती
सरन्यायाधीश म्हणाले, ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली’
तिरुपती व्हीआयपी दर्शन फसवणूक : वायएसआर काँग्रेसच्या आमदारासह दोघांवर गुन्हा
याबद्दल जयपूर पोलिसांनी सांगितले की, गुरुवार १७ रोजी जयपूरच्या कर्ण विहार मंदिरात जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नसीब चौधरीने गोंधळ घातला होता. झालेली गर्दी आणि होणारा आवाज जास्त असल्याचा दावा त्याने केला होता. करणी विहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते खीर वाटत होते तेव्हा दोन स्थानिक लोक तिथे पोहोचले त्यानंतर तिथे वादावादी सुरु झाली. वादावादी वाढल्यानंतर नसीब चौधरीने आपल्या ग्रुपला बोलावले आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.