महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण ९९ उमेदवारांची नावे आहेत. भाजपकडून कधीही यादी जाहीर होईल अशी चर्चा होती, आज अखेर पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली आहे. कांदिवली पूर्व मधून भाजप नेते अतुल भातखळकर तर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर मुलुंड मधून मिहीर कोटेचा. वांद्रेमधुन आशिष शेलार, मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा आणि कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी भाजपने दिली आहे.
कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक तर काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश करणाऱ्या राहुल प्रकाश अवाडे यांना ईचलकरंजी मधून उमेदवारी देण्यात आली आहे. अशी एकूण ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पुढील यादीही लवकरच येईल अशी चर्चा आहे.
हे ही वाचा :
सरन्यायाधीश म्हणाले, ‘अयोध्येच्या निकालावेळी मी देवांपुढे बसून प्रार्थना केली’
तिरुपती व्हीआयपी दर्शन फसवणूक : वायएसआर काँग्रेसच्या आमदारासह दोघांवर गुन्हा
वायनाडमध्ये नव्या हरिदास देणार प्रियांका गांधींना टक्कर!
प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे ‘महान राजकारणी’
कांदीवली पूर्व विधानसभा मतदार संघातून अतुल भातखळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने पक्षाचे आभार मानले आहेत. पक्षाने व्यक्त केलेल्या विश्वासाला किंचितही तडा जाऊ देणार नसल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत म्हटले, भाजपा नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत मला कांदीवली पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा. अमित शहा, पक्षाध्यक्ष मा. जगतप्रकाश नड्डा, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनःपूर्वक आभारी आहे. पक्षाने व्यक्त केलेल्या विश्वासाला किंचितही तडा जाऊ देणार नाही. निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाची विचारधारा आणि कमळ चिन्ह घरोघरी पोहचवू, असे भातखळकर यांनी म्हटले.