32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

Related

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटीच्या परिक्षेचे वेळापत्रक बारावीच्या परिक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर, सीईटीच्या तारखा कळू शकणार आहेत.

हे ही वाचा:

अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांचा सवाल

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता?

राज्यात सध्या कोविडमुळे शैक्षणिक क्षेत्रावर फार विपरीत परिणाम झाला आहे. विविध परिक्षांचे वेळापत्रक, अभ्यासक्रम इत्यादींचे गणित कोलमडले आहे. बारावीच्या परिक्षा देखील पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे बारावीनंतर होणाऱ्या अभियांत्रीकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या विविध अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटीचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे. या अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावर जेईई, नीट या परिक्षा दिल्या जातात, तर राज्य स्तरावर सीईटी दिली जाते.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई आणि नीट या परिक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्याच धर्तीवर सीईटीच्या तारखा देखील पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीईटीच्या तारखा स्पष्ट झालेल्या नसल्याने त्याचा ताण विद्यार्थ्यांवर देखील आला आहे. बारावीच्या परिक्षांच्या सुधारित वेळापत्रकानंतर या परिक्षेच्या तारखा कळतील. त्यासोबतच बारावीची परिक्षा आणि सीईटी यांच्यात विद्यार्थ्यांना तयारीसाठी थोडा कालावधी शिल्लक राहिल याची खबरदारी देखील शिक्षण विभागाला घ्यावी लागणार आहे. कोविडमुळे राज्यात शिक्षण क्षेत्रातील नियोजनाचा बोऱ्या उडाला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा