32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

Related

कोविडमुळे राज्यातील शिक्षण वेळापत्रकाचा पार बोजवारा उडालेला आहे. राज्यातील दहावीच्या परिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तर या मुल्यमापनातील गोंधळात आणखीनच भर पडली आहे.

राज्यातील अनेक शाळांमधील मुख्याध्यापकांनी अंतर्गत मुल्यमापनाच्या बाजूने कौल दिला असला तरीही, प्रत्यक्षात अनेक शाळांनी सुरूवातीपासून अंतर्गत मुल्यमापन केले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतिम मुल्यमापन कसे होणार हा मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ

सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

मुख्यमंत्री महोदय, २ मिनिटांत २ परस्पर विरोधी भूमिका कशा मांडता?

दहावीच्या परिक्षा कोविडमुळे रद्द करण्याचा निर्णय राज्यमंडळाने घेतला. मात्र हा निर्णय घेताना, दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा? कोणत्या निकषांच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्षांना प्रवेश द्यायचा? याचा कोणताही विचार केला गेला नव्हता. आता अंतर्गत मुल्यमापनाच्या सहाय्यानेच निकाल देण्याचा विचार केला जात आहे.

हा विचार केला जात असला तरी, शिक्षण विभागानेच गोळा केलेल्या आकडेवारीत अंतर्गत मुल्यमापन अनेक शाळांनी केले नसल्याचेच दिसत आहे. अंतर्गत मुल्यमापनासाठी विविध पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी बहुतेक शाळांनी व्हॉट्सअप्पच्या माध्यमातून मुल्यमापन केले असल्याचे कळत आहे. या प्रकारच्या मुल्यमापनाच्या आधारे निकाल कसा जाहिर करायचा आणि अकरावीच्या प्रवेशांचे कार्य कसे करायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा