32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष २-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी

२-१८ वयोगटातील मुलांसाठी होणार लसीची चाचणी

Related

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात २ ते १८ वर्षाच्या मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

भारत बायोटेक कंपनीला २ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची ट्रायल करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल ५२५ मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल होणार आहे. कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज ३ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज २ चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.

२ ते १८ वर्षांच्या मुलांवर करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज २ आणि फेज ३ च्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी द्यायला हवी, अशी शिफारस एसइसीने केली होती. भारतात सध्या ज्या दोन व्हॅक्सिनचा उपयोग केला जात आहे. त्या केवळ १८ वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. भारतात सीरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.

हे ही वाचा:

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ

सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट येणार असून या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिसऱ्या लाटेवर चिंता व्यक्त केली होती. तिसरी लाट आली तर लहान मुलांचं काय होणार? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या मुलांवर कशाप्रकारे उपचार होणार? आदी बाबींवर आतापासूनच विचार करण्याची गरज आहे, असं कोर्टाने केंद्राला म्हटलं होतं. तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाल्यानंतर अनेक राज्यांनी लहान मुलांसाठी स्पेशल रुग्णालय आणि कोविड सेंटर्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा