बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारा विरोधात देशासह इतर देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. बांगलादेश सरकारकडे अल्पसंख्यांकांच्या संरक्षांची मागणी करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अत्याचारा विरोधात राज्यासह देशात निषेध आंदोलने होत आहेत. याच दरम्यान, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुढे येवून हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारावर भाष्य केले आहे.
विशेष म्हणजे, बांगलादेश सोडून भारतात दाखल झालेल्या हसीना शेख यांना ४ महिने उलटून गेले आहेत. तेव्हा पासून अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुंवर अत्याचार सुरु आहे. कदाचित याची जाणीव उद्धव ठाकरेंना आता झाली असावी, त्यामुळे त्यांनी आज भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी आज (१३ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत हिंदूवरील अत्याचारावर भाष्य केले. तसेच बांगलादेशमध्ये हिंदुंवर जे अत्याचार होत आहेत, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, हिंदूंच्या रक्षणाबद्दल भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत असल्याचे बावनकुळे म्हणालेत. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली आहे.
हे ही वाचा :
भाजपाचे शिर्डीत प्रदेश अधिवेशन, मुख्यमंत्र्यांचा केला जाणार भव्य सत्कार!
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू प्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!
उद्धव ठाकरेंना बांगलादेशातील हिंदुंबद्दल कणव, मोदींनी लक्ष घालावे अशी मागणी
ते पुढे म्हणाले, बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक‘ मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती. भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही, यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. तुम्हाला विश्र्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 13, 2024