27 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरविशेषकुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली 'पहिली' शिकार

कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांनी केली ‘पहिली’ शिकार

चित्त्यांची केली पहिली शिकार

Google News Follow

Related

भारतात मागील ७० वर्षांपासून चित्ते नामशेष झाल्याची जाहीर झाले होते. हेच निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील कुनो पालनपुर या राष्ट्रीय उद्यानात आफ्रिका येथील नामिबिया येथून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. आंतरराष्ट्रीय नियांमनुसार, या चित्त्यांना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून या चित्त्यांना विलगीकरांनात ठेवण्यात आले होते. विलगीकरणातून बाहेर पडल्यानंतर या दोन चित्त्यांनी पहिली शिकार केल्याची माहिती वनसंरक्षक उत्तम कुमार शर्मा यांनी दिले.

तसेच नामिबियातून आणलेल्या या चित्त्यांना प्रथम निरीक्षणाखाली ठेवले गेले. त्यानंतर त्यांना १ महिना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. विलगीकरणातून प्रथम दोन चित्त्यांना बाहेर सोडण्यात आले. फ्रेडी आणि अल्टन यानावाच्या दोन नर चित्त्यांनी सर्वप्रथम २४ तासांच्या आताच रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान एका चितळाची शिकार केली. शिकार केल्यानंतर २ तास बसून हे नर शिकार खात होते. अशी माहिती वनसंरक्षक उत्तम कुमार शर्मा यांनी दिली. तसेच सोमवारी सकाळी वन पाहणी समितीला याबाबत माहीती मिळाली.

हे ही वाचा:

मुंबई-ठाण्यादरम्यान उभी राहणार सिनेसृष्टी

सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…

चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

वन विभागाने विस्तारीत केलेल्या या क्षेत्रात चोवीस तासांच्या आताच या नर जोडीने केलेल्या या यशस्वी शिकारीनंतर त्यांच्या शिकार करण्याच्या क्षमतेबद्दल उद्यान व्यवस्थापनाची चिंता आता दूर झाली आहे. सध्या या दोन चित्त्यांना ९८ हेक्टर अशा विस्तारीत बंदिस्त क्षेत्रात सोडण्यात आले आहे. या चित्त्यांच्या सोबत आणलेल्या बाकी इतर ६ चित्त्यांनाही टप्पाटप्प्याने सोडण्यात येणार आहेत. यामध्ये पाच माद्या आणि तीन नर असे ३० ते ६६ महीने वयोगटातील या चित्त्यांना या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहेत. तसेच या चित्त्यांची फ्रेडी, अल्टन, सवाना, आशा, ओबान, सिबिली आणि साईसा अशी चित्त्यांची नामकरण ठेवण्यात आली

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा