29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषएसी बंद झाल्याची तक्रार करणाऱ्या रेल्वे प्रवाशाला मिळाले ५० हजार

एसी बंद झाल्याची तक्रार करणाऱ्या रेल्वे प्रवाशाला मिळाले ५० हजार

शिवशंकर शुक्ला हे २०१७ मध्ये मुंबई-अल्हाबाद दुरोन्तो एक्सप्रेस मध्ये प्रवास करत होते व ट्रेनमधील एअर कंडिशनिंगच्या बिघाडामुळे त्यांना ४२ अंश उष्णता सहन करावी लागली.

Google News Follow

Related

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) यांना एका ज्येष्ठ नागरिकाला एकूण पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. शिवशंकर शुक्ला हे २०१७ मध्ये मुंबई-अल्हाबाद दुरोन्तो एक्सप्रेस मध्ये प्रवास करत होते व ट्रेनमधील एअर कंडिशनिंगच्या बिघाडामुळे त्यांना ४२ अंश उष्णता सहन करावी लागली.

आयोगाने म्हटले आहे की, “आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी त्यांने महागडे प्रथम श्रेणीचे तिकीट विकत घेतले. तरीही त्यांना गंभीर अस्वस्थतेचा सामना करावा लागला, तसेच ताजी हवेची कोणतीही पर्यायी सुविधा नसल्याने त्यांना गुदमरल्यासारखे झाले. संपूर्ण प्रवासात त्यांना ह्या गैरसोयीचा सामना करावा लागला”. आयोगाने पुढे सांगितले कि रेल्वे ने त्यांच्या तिकिटाचे सर्वे पैसे म्हणजेच एक हजार एकशे नव्वद रुपये परत केले आणि त्यांची चूकही मान्य केली. पुढे असे सादर करण्यात आले की एसी तंत्रज्ञांनी एसी सिस्टम दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली, तरीही कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांनी गॅस भरून सिस्टम दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि शुक्ला यांना २३.२५ अंशांच्या मानक थंड तापमानाबद्दल आश्वासन दिले. परंतु काही बदल जाणवला नाही.

हे ही वाचा:

मुंबई-ठाण्यादरम्यान उभी राहणार सिनेसृष्टी

सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…

चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड

भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं

शुक्ला ह्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तंत्रज्ञांनी एसी सिस्टीममध्ये भरलेला गॅस बाहेर पडल्याचे उघड झाले. ते पुढे म्हणाले की इटारसी जंक्शन (नियोजित थांबा नाही) येथे साखळी ओढली गेली. प्रवाशांनी नंतर ट्रेन थांबवली जिथे काही पावले उचलली गेली होती. परंतु एसीच्या दुरुस्ती कार्यावर कोणताही परिणाम झाला नाही. तक्रारीत पुढे म्हटले आहे की एसी चालू नसल्यामुळे, दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतसे डब्याची ची स्थिती आणखीनच बिघडली. दुसर्‍या दिवशी दुपारी एलटीटी टर्मिनसवर ट्रेन येईपर्यंत ही स्थिती कायम राहिली. तथापि, आयोगाने शुक्ला यांच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटले की, “सर्व आवश्यक यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आहे की नाही हे तपासणे पक्षाला बंधनकारक आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा