छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर असलेला ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून हा चित्रपट करमुक्त केला जावा यासाठी मागणी केली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांकडून होत असलेल्या मागणीवर महत्त्वाचे विधान केले आहे.
चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. महाराष्ट्राने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि करमणूक कर हा नेहमीकरिता रद्द केला आहे. राज्यात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी करच आपल्याकडे नाही,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक काय चांगलं करता येईल ते नक्कीच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.
हे ही वाचा :
काँग्रेसशासित हिमाचलमध्ये मशिदीसमोर उभारलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीत, तर आराध्य देव आहेत!
छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल विकिपीडियाला पोलिसांची नोटीस
अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा
“एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मानापासून अभिनंदन,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.