32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरविशेषमहाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे

महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे

Google News Follow

Related

महाराष्ट्रामधील कोरोना मृत्यूची संख्या आता १ लाखाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. शनिवारी हा आकडा ९९ हजार ५१२ होता. म्हणजेच रविवारी ही संख्या १ लाखाच्या घरात पोहोचेल. देशामध्ये सर्वाधिक मृतांची संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान सात देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्राचा यामध्ये क्रमांक फ्रान्सच्या अगदी जवळ पोहोचला आहे. फ्रान्समध्ये १ लाख ९ हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

राज्यामध्ये हा वाढता मृत्यूचा दर चिंतेची बाब असली तरी, आता सध्याच्या घडीला कोरोनारुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. राज्यातील एक अधिकारी या वाढत्या मृत्यूदराबाबत म्हणाले की, येत्या काही दिवसात मृतांची संख्या नक्की कमी होईल. राज्य टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यासंदर्भात म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती ही भीषण आहे. असे असले तरी राज्याने सार्वजनिक आरोग्यविषयक सर्वोत्तम उपाययोजना अवलंबिल्या आहेत.

हे ही वाचा:

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

खासदारकीवर दृष्टी, PR चा कोन

‘ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली’

मुंबईमधील रुग्णांची संख्या आता कमी होत आहे हे एक आश्वासक चित्र आहे. महापालिकेच्या एक अधिकारी म्यूकरमायकोसिस बद्दल बोलताना म्हणाले, या रुग्णांची संख्या दोन आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. परंतु यापैकी बर्‍याच रूग्णांना २-दिवसांच्या दीर्घकाळ उपचाराची आवश्यकता असल्याने अनेकांना अद्याप रुग्णालयात ठेवावे लागत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा