31 C
Mumbai
Friday, June 24, 2022
घरविशेषकाय आहे मोदी सरकारची 'अग्नीपथ योजना'? वाचा सविस्तर

काय आहे मोदी सरकारची ‘अग्नीपथ योजना’? वाचा सविस्तर

Related

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. देशातील तरुणांना या योजनेमुळे देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय रोजगार निर्माण होणार आहे.

अग्निपथ योजना काय आहे?

भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याचवेळी त्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना ‘अग्निवीर’ म्हटलं जाणार आहे. या माध्यमातून सैन्यदलांमध्ये म्हणजेच लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत.

अग्निवीर म्हणून सेवा देणाऱ्या अग्निवीरांना कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कामगिरीच्या आधारे स्थायी सेवेत दाखल होता येणार आहे. प्रत्येक तुकडीमधल्या २५ टक्के अग्निवीरांना या पद्धतीने स्थायी सेवेत जागा देण्यात येईल. ज्यांना भरती व्हायचं आहे अशा उमेदवारांना आवश्यक त्या वैद्यकीय पात्रता पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर सहा महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. साडेसतरा ते २१ वर्ष वय असणारे तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

अग्निपथ योजनेतून कोणत्या सोयी मिळणार आहेत?

अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे. त्यांच्या वेतनात दर वर्षी काही प्रमाणात वाढ होईल. शिवाय प्रत्येक अग्निवीराला त्याच्या मासिक वेतनामधली ३० टक्के रक्कम अग्निवीर समूह निधीत द्यावी लागणार आहे. यातून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील. चार वर्षांनंतर निवडलेल्या अग्निवीरांची सैन्यदलांतील कुठल्याही रेजिमेंटमध्ये किंवा युनिटमध्ये नियुक्ती होऊ शकते. ज्यांची नियुक्ती स्थायी सेवेत होणार नाही त्यांना इतर ठिकाणी नोकरी शोधावी लागणार आहे. सेवा काळात अग्निवीरांना विशिष्ट प्रतीक चिन्ह मिळणार आहे. तसंच विशिष्ट प्रसंगात उल्लेखनीय कामगिरी बजावली की त्या अग्निवीरांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाईल. प्रत्येक अग्निवीराला ४८ लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जाणार आहे. सेवाकाळात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. सेवेत असताना काही कारणास्तव अपंगत्व आलं तर १५ ते ४४ लाखापर्यंतचे सहाय्य केले जाणार आहे.

अग्निपथ योजनेचा फायदा काय आहे?

या योजनेमुळे युवकांना लष्करी सेवेची संधी मिळणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या मनात लष्करी गणवेश परिधान करण्याची एक सुप्त इच्छा असतेच. या योजनेतून अनेकांची ती इच्छा पूर्ण होईल. यातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक विकास, टीम बिल्डिंग, कौशल्य विकास आणि डिसिप्लिन अशा विविध गोष्टी युवकांना या चार वर्षात आत्मसात करता येतील. या योजनेतून रोजगाराच्या संधी वाढतील.

सध्याच्या आकडेवारीनुसार सैन्यदलांत साधारण ९ हजार अधिकारी आणि १ लाख १३ हजार कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. दरवर्षी साधारणतः ६० ते ६५ हजार अधिकारी, जवान निवृत्त होतात. शिवाय एक पद, एक निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यामुळे सरकारला मोठा आर्थिक भार पेलावा लागतोय. संरक्षण दलाच्या अंदाजपत्रकातील ३० टक्के निधी त्यावर खर्च होतो. या नव्या योजनेमधून प्रामुख्याने आर्थिक भार हलका करून रिक्त पदं भरण्याकडे लक्ष असणार आहे. पुढील ९० दिवसांत ही योजना सुरू होणार असून पहिली बॅच २०२३ पर्यंत येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा