29 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरक्राईमनामाकरणवीर बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

करणवीर बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Related

अभिनेता मनोज महेंद्रकुमार बोहरा उर्फ ​​करणवीर बोहरा याच्यासह सहा जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार,१५ जून रोजी करणवीर बोहरा याच्यावर ४० वर्षीय महिलेला जवळपास दोन कोटींच्या आसपास फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१९ मध्ये करणवीरचा ‘हमे तुमसे प्यार कितना’ हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हा करणवीरने ओशिवरा भागात राहणाऱ्या महिलेशी मैत्री केली होती. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी महिलेकडून ३५ लाख रुपये घेतले. त्यानंतर आरटीजीएसद्वारे त्या महिलेकडून पुन्हा १ कोटी ६६ लाख रुपयेही घेतले, असा दावा त्या महिलेनं केला आहे. त्या महिलेने तक्रारीत हेही नमूद केले आहे की, बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी तिला पैसे परत मागितल्यावर गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. तसेच २.५ टक्के व्याजाने ते पैसे परत देण्याचे आश्वासन देऊन त्याने, इतर पाच लोकांसह महिलेकडून पैसे घेतले होते. महिलेची करणवीरनं एक कोटीहून अधिक रक्कम परत केली आहे, मात्र उर्वरित रक्कम देत नसल्याचे महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी करणवीर बोहरा या नावाने प्रसिद्ध असलेल्या मनोज बोहराविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांखाली तक्रार नोंदवली आहे. तपास सुरू असताना, ओशिवरा पोलिसांनी सांगितले की, अधिकारी लवकरच त्याचा जबाब नोंदवणार आहेत.

हे ही वाचा:

नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच विक्रम!

मराठवाड्यातील पाणीप्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष

अनिल परब ईडी चौकशीसाठी गैरहजर

१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी

दरम्यान, लॉक शो मध्ये जेव्हा तो सहभागी झालं होता. तेव्हा त्याने एक खुलासा केला होता. मी आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि कर्जाचे पैसे परत न केल्यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कोणी नसता तर मी आत्महत्या केली असती, असे त्याने सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा