28 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषहमासच्या इस्रायलवरील हल्ल्याची माहिती आधीच वृत्तछायाचित्रकारांना होती?

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याची माहिती आधीच वृत्तछायाचित्रकारांना होती?

टोरंटोमधील इस्रायलचे राजदूत इदित शामीर यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्याची माहिती आधीच गाझामधील वृत्तछायाचित्रकारांना होती, ते तेव्हा सीमेवर होते, अशी माहिती इस्रायलच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. या अधिकाऱ्याने गुरुवारी सोशल मीडियावर जागतिक वृत्तसंस्था आणि मोठ्या मीडिया हाऊससाठी काम करणाऱ्या स्वतंत्र वृत्तछायाचित्रकारांच्या उपस्थितीबाबतचे वृत्त दिले. हमासच्या या हल्ल्यात सुमारे १४०० इस्रायली मारले गेले तर, २००हून अधिक जणांचे अपहरण झाले होते.

टोरंटोमधील इस्रायलचे राजदूत इदित शामीर यांनी इस्रायलच्या वृत्तसंस्थेने दिलेली माहिती ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी हमास दहशतवादी इस्रायलमधील सीमावर्ती भागावर हल्ला करत होते, तेव्हा गाझा येथील वृत्तछायाचित्रकार हे क्षण कॅमेऱ्यात कैद करत होते. त्यामुळे या पत्रकारांना ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करण्याच्या दहशतवादी गटाच्या कटाची आधीपासूनच माहिती होती, असा संशय निर्माण झाला आहे.

इदित शमीर यांनी गाझास्थित या मुक्त वृत्तछायाचित्रकारांची दोन छायाचित्रे पोस्ट केली आहेत, जे गाझा सीमेवर हमासच्या सुरुवातीच्या हल्ल्याचे क्षण टिपत होते. एका छायाचित्रात हसन इस्लाया हा वृत्तछायाचित्रकार ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड, गाझाचा हमास प्रमुख याह्या सिनवार हा गालावर चुंबन घेत असल्याचे चित्र आहे. इस्रायलच्या या वृत्तसंस्थेने या मुक्त वृत्तछायाचित्रकारांची ओळख पटवली आहे. हसन इस्लाया, युसेफ मसूद, अली महमूद, हातम अली, मोहम्मद फैक अबू मुस्तफा आणि यासर कुदीह हे वृत्तछायाचित्रकार इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यादरम्यान घटनास्थळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

हमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

रॉयटर्स, द असोसिएटेड प्रेस आणि द न्यूयॉर्क टाइम्ससाठी काम करणाऱ्या या मुक्त वृत्तछायाचित्रकारांनी जळत्या इस्रायली टाकीची, हमासने अपहरण केलेल्या आणि काही दिवसांनी मरण पावलेल्या जर्मन-इस्रायली महिला शनी लुकसह नागरिकांचे मृतदेह वाहून नेत असतानाची छायाचित्रे काढली आहेत.हमास हल्ल्याचे वृत्तांकन करणाऱ्या या मुक्त वृत्तछायाचित्रकारांनी काढलेली ही छायाचित्रे आता सोशल मीडियावरून हटवण्यात आली असली तरी, त्यांनी केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका पोस्टमध्ये, हसन इस्लाया हा हमासने ताब्यात घेतलेल्या इस्रायली रणगाड्यासमोर उभे असल्याचे दिसले.

तो ‘प्रेस’चे टी-शर्ट किंवा हेल्मेटशिवाय वार्तांकन करताना दिसला. युद्धक्षेत्रातून वार्तांकन करताना पत्रकारांनी या दोन बाबी परिधान करणे अनिवार्य आहे.एका व्हिडिओमध्ये हसन इस्लाया गाझामधील युद्धाविषयी वृत्त देतानाही दिसतो. मात्र अचानक तो थांबतो आणि चिंताग्रस्त दिसतो. तेव्हा मागे हमासचे दहशतवादी आणि वाहनांचे आवाज ऐकू येतात.
हमास अनेक महिन्यांपासून इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधोरेखित करून, हे मुक्त पत्रकार ७ ऑक्टोबरच्या पहाटे गाझा सीमेवर हजर झाले होते का किंवा ते या हल्ल्याचा भाग होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा