32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषबेस्टची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच धावणार

बेस्टची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच धावणार

सरकारने केली जय्यत तयारी

Google News Follow

Related

मुंबईकरांना लवकरच डबल डेकर बसची सुविधा मिळणार आहे. सरकारने यासाठी तयारी केली आहे. प्रोटोटाइप इलेक्ट्रिक डबल-डेकर बस सर्व आवश्यक गरजांसह तयार असल्याचं बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बेस्ट अनेक दिवसांपासून इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवण्याचा प्रयत्न करत आहे. या बस लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर धावताना बघायला मिळतील.

याबाबत माहिती देताना बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यावर आणण्यापूर्वी काही चाचण्या करणे अपेक्षित आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या ४००पेक्षा जास्त सिंगल डेकर इलेक्ट्रिक बस आहेत. याशिवाय त्यांनी टप्प्याटप्प्याने ९०० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डरही दिली आहे. यापैकी पन्नास टक्के वितरण मार्च २०२३ पर्यंत केले जाईल.

बेस्ट उपक्रम बृहन-मुंबई हद्दीत तसेच नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर भागात बस वाहतूक देते. सरासरी २.९ दशलक्ष लोक दररोज ३,८००० इलेक्ट्रिक बसेसच्या मदतीने ५०५ बस मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या ६३,७०० फेऱ्यांमधून प्रवास करतात. ताफ्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसची भर घातल्याने, पर्यावरणपूरक प्रवासाकडे अधिक प्रवाशांना आकर्षित करण्याचा बेस्ट उपक्रमाचा हेतू आहे.

हे ही वाचा:

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून जॅकलिन फर्नांडिसचे नाव

निवडणूक समितीतून गडकरी गेले, फडणवीस आले!

आर्थिक मंदी तीही भारतात ? अशक्य

अशी आहे इ-डबलडेकर

ही इ-डबलडेकर वजनाने हलकी असून बसण्यासाठी आतमध्ये प्रशस्त जागा आहे. या बसला २५० किलोवॅटची इलेक्ट्रीक मोटर आहे. या बसची ९९ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस १९० मैल किंवा ३०५ किमी अंतर पार करू शकते.

९०० इलेक्ट्रिक बसच्या पुरवठ्यासाठी करार

बेस्टने ९०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यासाठी एका खाजगी कंपनीसोबत करार केला आहे, त्यापैकी ५० टक्के बसेस मार्च २०२३ पर्यंत वितरित केल्या जातील. बेस्टच्या ताफ्यात १९९० पासून ९०० पारंपारिक डबल-डेकर बस होत्या, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या घटली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा