30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरविशेषएल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त!

एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त!

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई

Google News Follow

Related

प्रसिद्ध युट्युबर आणि बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव आणि पंजाबी गायक राहुल यादव उर्फ ​​फाजिलपुरिया यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त केली आहे. यूपी आणि हरियाणामध्ये या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे. यापूर्वी, ईडीने एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांचे जबाबही नोंदवले आहेत आणि दोघांचीही सखोल चौकशी केली आहे.

एल्विश यादववर नोएडा पोलिसांनी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एल्विश यादववर सापाच्या विषाचा वापर, आर्थिक व्यवहारचा आरोप आहे. या प्रकरणी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी १७ मार्च रोजी अटक केली होती, त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. नोएडा पोलिसांनी एप्रिलमध्ये या प्रकरणी १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. साप तस्करी, अंमली पदार्थांचा वापर आणि रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.

हे ही वाचा :

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!

आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्यांना काँग्रेसने फटकारले

मुलाच्या अंत्यविधीसाठी सुरक्षा द्या! मृत अक्षय शिंदेच्या कुटुंबाचे शाह आणि फडणवीसांना पत्र!

दरम्यान, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई करत एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली ही मालमत्ता यूपी आणि हरियाणामधील आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा