30 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरविशेषइलेक्टोरल बॉण्ड्स: बीआरएसला एमइआयएलकडून सर्वाधिक देणगी

इलेक्टोरल बॉण्ड्स: बीआरएसला एमइआयएलकडून सर्वाधिक देणगी

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या निवडणूक रोख्यांच्या आकडेवारीनुसार मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (एमईआयएल) भारत राष्ट्र समिती (बीआरएस) साठी सर्वात मोठी देणगी देणारी होती तर वेदांत लि. काँग्रेससाठी इलेक्टोरल बाँड्सचा सर्वात मोठा देणगीदार होता, असे स्पष्ट झाले आहे. डेटावरून असे दिसून येत आहे की काँग्रेस पक्षाने एकूण १ हजार ४२२ कोटी रुपये जमा केले, त्यापैकी वेदांता लिमिटेडने १२५ कोटी रुपयांचे योगदान दिले, त्यानंतर ११० कोटी रुपये वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, एमइआयएलची हि उपकंपनी आहे. तर ९१.६ कोटी रुपये हे एमकेंजे कंपनीकडून आले आहेत.तसेच कें. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने एकूण १ हजार २१४ कोटी रुपये जमा केले आहेत. त्यापैकी १९५ कोटी रुपये एमकेआयएल कडून ९४ कोटी रुपये यशोधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून आणि ५० कोटी रुपये चेन्नई ग्रीन वुड्स प्रायव्हेट लिमिटेडकडून आले आहेत.

मेघा इंजिनियरिंग या इलेक्टोरल बॉण्ड्सची दुसरी सर्वात मोठी खरेदीदार असून त्या बदल्यात भाजपला सर्वाधिक पैसे दिले, असे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी अलीकडेच अशी फेक न्यूज पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. १४ मार्च रोजी समाज माध्यमावर एका पोस्टमधून त्यांनी ११ एप्रिल २०२३ रोजी मेघा इंजिनिअरिंग १०० कोटी इलेक्टोरल बॉण्ड्समध्ये कोणाला देते? पण महिन्याभरातच भाजप सरकारकडून १४,४०० कोटींचे कंत्राट मिळते! असे पसरवले होते. भाजप मेघा इंजिनिअरिंग कंपनीकडून बेकायदेशीरपणे निवडणूक बाँडच्या स्वरूपात ‘लाच’ घेत आहे आणि त्या बदल्यात त्यांना मोठ्या पायाभूत सुविधांची कंत्राटे देत असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा..

वडील गृहमंत्री असताना कार्ति चिदंबरमनी घेतले ५० लाख

उत्तर प्रदेशमधील मदरसा शिक्षण कायदाच अवैध

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

अण्णा हजारे बोलले, केजरीवाल यांची केली पोलखोल

मेघा इंजिनियरिंग चालवणारी मेघा कृष्णा रेड्डी ही भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या जवळची म्हणून ओळखली जाते. एमआयइएल ने केवळ राव यांच्या बीआरएस पक्षाला सर्वात मोठी रक्कम दान केली नाही तर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला १०० कोटींहून अधिक रोख रक्कम दान केली आहे. याशिवाय डीएमके, आम आदमी पार्टी जेडीएस आणि वायएसआरसीपी यांनाही देणग्या दिल्या आहेत. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या इलेक्टोरल बाँड डेटामध्ये इतर प्रादेशिक पक्ष आणि सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपकडून मिळालेल्या रकमेचा खुलासा करण्यात आला आहे.

सँटियागो मार्टिनच्या फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसने ५४२ कोटी रुपये, किंवा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला दिलेल्या सर्व देणग्यांपैकी ३३.७ टक्के देणगी दिली आहे. तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या सर्व देणग्यांमध्ये हल्दिया एनर्जी लिमिटेडचा वाटा १७.५ टक्के किंवा २८१ कोटी रुपये आहे.एस्सेल मायनिंगमधून रु. १७४.५ कोटी जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेडकडून रु. १०० कोटी आणि उत्कल अल्युमिना इंटरनॅशनल लिमिटेडकडून रु. ७० कोटी, बिजू जनता दलाने एकूण रु. ७७५ कोटी जमा केले आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा