जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलोन मस्क यांचे वडील एरोल मस्क हे आज (४ जून) अयोध्येत पोहोचले आणि प्रभू रामांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अलेक्झांड्रा देखील होती. प्रभू रामांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हनुमानगढी मंदिराचेही दर्शन घेतले. यावेळी ते कुर्ता आणि पायजाम्यात दिसले.
राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर, एरोल मस्क म्हणाले, “भारत हे एक अद्भुत ठिकाण आहे. शक्य तितक्या लोकांनी भारतात यावे. मी ज्या देशातून आलो आहे तिथे बरेच भारतीय आहेत. म्हणून, मला भारतीय संस्कृती माहित आहे. येथील लोक प्रेमळ आणि दयाळू आहेत, सर्वोत्तम लोक आहेत. आमच्याकडे काही स्मार्ट (व्यवसायिक) योजना आहेत ज्यांचा विचार केला जात आहे… मला वाटते की ते (भारत-अमेरिका संबंध) खूप चांगले असतील.”
हे ही वाचा :
पं. नेहरूंचं पत्र शेअर कर निशिकांत दुबेंनी राहुल गांधी यांना काय केला सवाल ?
बजरंग दलने मुनव्वर फारूकीच्या शोला केला विरोध
इराणी सरकारच्या प्रयत्नांचे भारतीय दूतावासाकडून का झाले कौतुक
वाराणसीत बकऱ्यांची किंमत बघा कितीवर पोहोचली !
एरोल मस्क यांच्यासोबत विवेक बिंद्रा देखील उपस्थित होते. विवेक बिंद्रा हे प्रेरक वक्ते आहेत. त्यांनी एरोल मस्क यांच्या कार्यक्रमांबद्दल आणि त्यांच्या भारत भेटीच्या उद्देशाबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, जेव्हा संपूर्ण जग राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहे, तेव्हा जगभरातील भारतीयांनी आता अयोध्येत येण्यास उशीर करू नये.
