केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर देशभरात आयोजित केल्या जात असलेल्या तिरंगा यात्राला सैन्याच्या सन्मानार्थ देशाची एकजूट असे संबोधले. रविवारी केंद्रीय मंत्री जोधपूरमध्ये होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पहलगाममधील भयावह घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश स्पष्ट होता — की अशा क्रूर दहशतवादी कृत्यामागे असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला कल्पनाही न करता येईल अशी शिक्षा दिली जाईल. त्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, ज्यामुळे देशातील १४० कोटी जनतेला सैन्याबद्दल अपार अभिमान आणि सन्मान वाटू लागला. जाती, भाषा, वर्ग, प्रदेश आणि राजकीय विचारसरणींपलीकडे जाऊन लोक एकत्र येऊन भारतीय सशस्त्र दलांचा सन्मान करत आहेत.
शेखावत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि भारतीय लष्कराने दिलेल्या कडव्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानला भारतापुढे गुडघे टेकावे लागले. पाकिस्तानने सीझफायरची मागणी करत डीजीएमओशी संपर्क साधला. या सर्व घडामोडींनंतर जे लोक भारताला २०१४ पूर्वीप्रमाणे कमजोर समजत होते, त्यांना आता भारतीय सैनिकी सामर्थ्याची प्रचिती आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संपूर्ण देशात १४० कोटी लोकांत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन सुरू झाले आहे. लोक यात सहभागी होऊन आपला सैन्याबद्दलचा आदर व्यक्त करत आहेत. जोधपूरमध्येही तिरंगा यात्रा होणार आहे आणि ती ऐतिहासिक ठरेल असा मला विश्वास आहे.
हेही वाचा..
भारताच्या सागरी खाद्य निर्यातीत मोठी झेप
गोवा आता ‘भोगभूमी’ नाहीतर ‘योगभूमी’ आणि ‘गो-माता भूमी’
खालच्या पातळीवरचे राजकारण काँग्रेसला संपवणार!
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ कांदिवलीत ‘तिरंगा पदयात्रा’
पुढे बोलताना शेखावत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजस्थान दौरा फक्त राज्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशाला संदेश देणारा ठरेल. पीएम मोदी ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत १०० हून अधिक स्टेशनांचे उद्घाटन करतील. याच दौऱ्यात मोदी सैन्याचे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याशीही संवाद साधणार आहेत.
