ऑपरेशन सिंदूरच्या अद्भुत यशानंतर, भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेतील समस्त नागरिकांनी कांदिवली पूर्व आणि मालाड पूर्व येथे ‘तिरंगा पदयात्रा’ आयोजित केली होती. या पदयात्रेला कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होता. ‘हिंद की सेना शान है, घुटने पे पाकिस्तान है’, ‘ वंदे मातरम’ ‘भारत माता की जय’ या घोषणांच्या जय घोषात ही यात्रा निघाली.
आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्तं करण्यासाठी नागरिकांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्याच्या धाडसाला आणि शौर्याला आम्ही सलाम करतो, आम्हा सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे अशा कृतज्ञ भावना भातखळकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी सैनिक कर्नल जगदीश बरसीचा, कर्नल अशोक झा, भारतीय सशस्त्र सेनेतील माजी अधिकारी बलराम रेड्डी, जगदीश सिंह, सुनील राउल, कमलेश शर्मा, भारतीय नौदलचे माजी अधिकारी मदनलाल शर्मा, भारतीय वायुदलाच्या माजी अधिकारी अंजली नेरुला सर्वश्री धरम सिंह राठी, गजानन पालवे, हरचित बरार, आणि सुभेदार चोप्रा या निवृत्त सैनिकांचा मालाड पूर्व येथील सी.ओ.डी. येथे सन्मान आणि अभिनंदन करून यात्रेचा समारोह करण्यात आला.
हे ही वाचा :
‘तिरंगा यात्रे’बाबत आमदार भातखळकर यांनी ट्वीटकरत म्हटले, आज माझ्या कांदिवली पूर्व मतदारसंघातील मालाड पूर्व मंडळामध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या वीरांना तिरंगा रॅली काढून मानवंदना देण्यात आली. सेना दलाच्या काही माजी अधिकाऱ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
जनतेमध्ये एकूणच लष्कराबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे. सर्वश्री धरम सिंह राठी, गजानन पालवे, हरचित बरार, आणि श्सुभेदार चोप्रा या निवृत्त सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तिरंगा पदयात्रेस मोठ्या संख्येने नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1923993118661337290
