31 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेषसावरकर स्मारकात आता शिकविली जाणार तलवारबाजी

सावरकर स्मारकात आता शिकविली जाणार तलवारबाजी

Related

दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आता तलवारबाजी या क्रीडा प्रकारासाठी मुंबई फेंसिंग असोसिएशनच्या सहयोगाने सावरकर फेंसिंग क्लब सुरू करण्यात आला आहे. शनिवार, ४ सप्टेंबर २०२१ या दिवशी सायंकाळी पाच वाजता या क्लबचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वास्तुमध्ये हा दिमाखदार क्रीडा प्रकार आता शिकता येणार आहे. तसेच त्याचा आनंदही नव्या पिढीला घेता येणार आहे.

समारंभाचे निमंत्रक आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी क्लबच्या या आगळ्या उपक्रमाचे स्वागत केले. ऑलिंपिकमध्ये या क्रीडा प्रकारात प्रथमच पात्रता स्तरापर्यंत एक भारतीय खेळाडू गेली आहे, ही बाब लक्षात घेता या प्रकारच्या खेळाला प्रोत्साहन मिळणे आणि नव्या पिढीनेही त्यात प्रावीण्य मिळवणे अपेक्षित असल्याचे सांगत या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्वातंत्र्यवीर स्मारकाचे कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते. या निमित्ताने मुंबई फेंसिंग असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील  खेळाडूंनीही प्रात्यक्षिके करून एक वेगळीच चुणूक दाखवून दिली. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी २५२ स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी उद्यान, दादर, दूरध्वनी क्रमांक ०२२- २४४६५८७७ येथे संपर्क साधावा.

हे ही वाचा:

बापरे! नीरज चोप्रा घेतोय जाहिरातीसाठी इतकी रक्कम…

जागा हडप करण्यासाठी वाजवले जातात फटाके…

चोरी करून कंत्राटदाराचा मृतदेह जमिनीत पुरला; दोघांना बेड्या

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

इंडियन ऑलिंपिक कमिटीचे जॉइंट सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्या प्रमुख आतिथ्याखाली झालेल्या उद्घाटन समारंभात जंप रोप असोसिएशन, मुंबईचे वर्किंग प्रेसिडेंट सुनील मोरे, डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स, महाराष्ट्र स्टेटचे डेप्युटी डायरेक्टर अनंत इंदुलकर, वुडबॉल गेमचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू हेमंत भालेराव, मुंबई फेंसिंग असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल वाघमारे हे मान्यवरही उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा