25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरविशेषकतरिना-विकी कौशलविरोधात कुणी दाखल केला गुन्हा?

कतरिना-विकी कौशलविरोधात कुणी दाखल केला गुन्हा?

Related

कतरिना कैफ-विकी कौशलचा विवाह राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट येथे होणार आहे. दरम्यान, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील एका वकिलाने हा गुन्हा दाखल केला आहे.

लग्नासाठी बंद करण्यात आलेला चौथ माता मंदिराचा मार्ग खुला करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. चौथ मातेच्या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. रस्ता बंद केल्याने भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विकी-कतरिना राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्न करणार आहेत. आजपासून म्हणजेच मंगळवारपासून २ दिवस बॉलिवूड स्टार्स तिथे उपस्थिती लावणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये हे जोडपं लग्न करणार आहे ते सवाई माधोपूरच्या बरवडा चौथमध्ये आहे. या ठिकाणी चौथ मातेचे मंदिर आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता बंद केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

…त्या बाळाचे पालक आता मुंबईच्या महापौर!

विंटर ऑलिम्पिकवर अमेरिकेचा बॉयकॉट

नवाब मलिक यांना न्यायालयाने फटकारले

राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; पोस्टरवरून फोटो गायब

सवाई माधोपूर येथील नेत्रबिंदू सिंग जदून यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत कतरिना- विकी सोबतच जिल्हाधिकारी सवाई माधोपूर आणि हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवराच्या व्यवस्थापनालाही जबाबदार धरण्यात आले आहे. राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कैफ आणि कौशलच्या लग्नामुळे ६ ते १२ डिसेंबरपर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाविकांची होणारी गैरसोय पाहता हा रस्ता खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा