मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एका इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत इमारतीचे चार मजले भक्ष्यस्थानी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवरील बेहरामपाडा परिसरातील JMS बिझनेस सेंटर या इमारतीत सकाळी १०.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागात बिजनेस पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली. सकाळी १०.४५ च्या सुमारास इमारतीच्या एका गाळ्यामधे मोठी आग लागली. ही आग चार मजल्यांवर पसरली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. इमारतीमध्ये मोठ्या संख्येने कॉर्पोरेट ऑफिस असून सुदैवाने या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नसून ओशिवरा पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा :
“मर्द असाल तर स्वतः समोर येऊन सामना करा!” पाक लष्करप्रमुखांना खुले आव्हान
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा?
युद्ध निधीला आळा घालण्यासाठी रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर अमेरिकेकडून निर्बंध
आसाम सरकारची ‘लव्ह जिहाद-बहुपत्नीत्व’ विरोधात विधेयक मांडण्याची योजना!
आग लागल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. या घटनेची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला सकाळी १०:५१ मिनिटांनी देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाची वाहने, स्थानिक पोलीस, १०८ रुग्णवाहिका, पीडब्ल्यूडी पथक, महापालिकेचे प्रभाग कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.







