भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून एकदिवसीय मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. अशातच दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहली हा शून्यावर बाद झाला. यानंतर आता क्रीडाविश्वात नव्या चर्चेला उधाण आले आहे. विराट कोहली निवृत्ती घेणार का असा सवाल विचारला जात आहे.
विराट कोहली हा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याच्या कृतीमुळे तो निवृत्तीचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे. विराट हा त्याच्या ३०४ सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत पहिल्यांदाच सलग दोन डावात शून्यावर बाद झाला आहे. अॅडलेडमध्ये बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने हात वर करून डोके वाकवले आणि प्रेक्षकांचे आभार मानले जणू काही तो क्रिकेटला निरोप देत आहे. अॅडलेड ओव्हल हे विराट कोहलीसाठी एक खास ठिकाण आहे. या मैदानावर विराट कोहलीइतके धावा इतर कोणत्याही पाहुण्या फलंदाजाने केलेल्या नाहीत. त्याने या मैदानावर ९७५ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
VIRAT KOHLI GONE FOR HIS SECOND DUCK OF THE SERIES!#AUSvIND | #PlayoftheDay | @BKTtires pic.twitter.com/jqIdvMeX9T
— cricket.com.au (@cricketcomau) October 23, 2025
हे ही वाचा :
युद्ध निधीला आळा घालण्यासाठी रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर अमेरिकेकडून निर्बंध
आसाम सरकारची ‘लव्ह जिहाद-बहुपत्नीत्व’ विरोधात विधेयक मांडण्याची योजना!
बिहारमधील कुख्यात रंजन पाठक-मनीष पाठक टोळीचा खात्मा; चौघांचा ‘एन्काऊंटर’
भाई जगताप म्हणतात, उद्धव ठाकरेंशी युती नको!
टी- २० आणि कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता विराटच्या खेळीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर तो त्याची पहिली मालिका खेळत असताना फारसा यशस्वी ठरला नाही. रविवारी (१९ ऑक्टोबर) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर मालिकेच्या पहिल्या सामन्यातही कोहली आठ चेंडूंत शून्यावर आऊट झाला. यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही विराट शून्यावर बाद झाला. यामुळे चाहते नाराज झाले तर त्याने मैदानातून परतताना केलेल्या कृतीमुळे तो निवृत्ती जाहीर करेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत असून चर्चांना उधाण आले आहे.







