केशवसृष्टी पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून असून यंदाचा पुरस्कार विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापिकांना मिळाला आहे. ठाणे येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून केशवसृष्टीचे अध्यक्ष डॉ. सतिश मोढ यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
१६ वा केशवसृष्टी पुरस्कार समारंभ शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे. ठाण्याच्या तलावपाळीजवळील श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्था येथे हा सोहळा सायंकाळी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापिका/विश्वस्त श्रीमती गीता शहा या यंदाच्या पुरस्कारच्या मानकरी ठरल्या आहेत.
हे ही वाचा:
बोरिवलीमध्ये ब्रह्मविद्येचे ऑफलाईन वर्ग
माउंट एव्हरेस्टवर हिमवादळ; १,००० ट्रेकर्स अडकले
दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर कटकमध्ये कर्फ्यू
“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?
- तारीख- शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५
- वेळ- सायं ४ ते ६
- ठिकाण- श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्था, डॉ. मुस रोड, तलावपाळी जवळ, नाना- नानी पार्क समोर, शिवसमर्थ शाळेशेजारी, ठाणे (पश्चिम)







