29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषएटीएम ते जीएसटी; महाराष्ट्र दिनापासून होणार चार मोठे बदल !

एटीएम ते जीएसटी; महाराष्ट्र दिनापासून होणार चार मोठे बदल !

१ मे २०२३ पासून अनेक नियम बदलणार आहेत.त्यामुळे थेट सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम होणार आहे.गॅस सिलेंडरपासून अनेक क्षेत्रात तसेच एटीएमसंबंधी नियमात बदल होईल.

Google News Follow

Related

१ मे नवीन महिन्याची सुरुवात होत आहे.त्यामुळे अनेक क्षेत्रात बदल (Rule Changes) दिसून येतील. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर पडेल. गॅस सिलेंडरच्या किंमतीत (Gas Cylinder Price) बदल होऊ शकतो. वस्तू आणि सेवा करांपासून (GST) ते म्युच्युअल फंडासंबंधीच्या नियमात बदलाचे वारे आहे. १ मे रोजी तुमच्या मोबाईलवरील कॉल आणि एसएमएस संबंधी सर्वात फायदेशीर बदल होत आहे. त्यामुळे तुमची नकोशा कॉल्सपासून सूटका होणार आहे. आता कॉल आणि फसवणुकीच्या एसएमएसच्या जाळ्यात कोणी अडकणार नाही.

म्युच्युअल फंड

बाजार नियामक संस्था सेबीने (SEBI) म्युच्युअल फंड (Mutual Fund) कंपन्यांना नियमांचे पालन करण्याची ताकीद दिली आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांना ई-वॉलेटचा वापर करण्यासाठी, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. हा नियम १ मे पासून लागू होणार आहे. केवायसीसाठी तुमचा पॅनकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँकेचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल. यासंबंधीचा एक अर्ज ही भरावा लागेल.

हे ही वाचा:

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

मन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

मुंबई मेट्रोतून करा २५ टक्के सवलतीच्या दरात प्रवास

जीएसटी नियमांत बदल

१ मे पासून व्यापारांना, व्यावसायिकांना जीएसटीमध्ये मोठा बदलाची पूर्तता करावी लागणार आहे. आता १०० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांसाठी हा नियम आहे. त्यानुसार, या कंपन्यांनी व्यवहाराची पावती सात दिवसांत इनवॉयस रजिस्ट्रेशन पोर्टलवर (IRP) अपलोड करणे आवश्यक आहे. हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. अजून यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला नाही.

गॅस सिलेंडरच्या किंमती

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात. १ एप्रिल रोजी सरकारने १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली होती. एका वर्षात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत २२५ रुपयांची कपात झाली आहे.

एटीएम बाबत मोठा बदल

देशातील सर्वात मोठी सरकारी बँकेतील एक पंजाब नॅशनल बँकेने एटीएमच्या व्यवहाराशी संबंधित काही नियमांत बदल केला आहे. नवीन नियम १ मे पासून लागू होतील. जर ग्राहकांच्या खात्यात शिल्लक रक्कम नसेल आणि एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न झाला तर ग्राहकाला १० रुपयांसह जीएसटी शुल्क द्यावे लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर नोटीस काढून याविषयीची माहिती दिली आहे.

नकोशा कॉल्सपासून ग्राहकांची सुटका

TRAI, ग्राहकांना या नकोशा कॉल्सपासून वाचविणार आहे. तसेच खोट्या एसएमएसपासून मुक्ती देणार आहे. त्यासाठी आभासी तंत्रज्ञानाचा, म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI Filter) वापर करण्यात येईल. या यंत्रणेमुळे नेहमी सतावणाऱ्या कॉल्सची, एसएमएसची ओळख पटेल आणि तुमच्या फोनपर्यंत हे कॉल्स येणारच नाहीत. नेटवर्कवरच हे कॉल्स फिल्टर होतील. त्यासाठी १ मेपासून मोठे बदल करण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा