27 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरविशेषस्वातंत्र्यसेनानी आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा वाडेकर कालवश

स्वातंत्र्यसेनानी आरएसएसचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा वाडेकर कालवश

वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दादा वाडेकर यांचे मंगळवार दिनांक १४ मार्च रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वाड्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. दादा वाडेकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांचे सासरे होत.

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा पुढे नेण्याचं काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. यशस्वी उद्योगा बरोबर सेंद्रिय शेती करत असताना परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी शेतीची अवजारे तयार करण्याची कंपनी सुरू केली होती. वाडा परिसरातील असंख्य कोवळ्या मनावर त्यांनी शाखेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाचे संस्कार बिंबवले. वाड्यातील संघाच्या अनेक संस्था, संघटनांवर त्यांच्या आत्मियतापूर्ण शैलीचा प्रभाव होता. ते संघाचा चालता बोलता स्मृतिकोषच होते.

हे ही वाचा:

ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?

ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?

अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या

चीन-पाक निर्मित JK 17 एअरक्राफ्ट खराब, म्यानमारला केला जात होता पुरवठा

“दुरीतांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे र्वांछिल तो ते लाभो प्राणी जात “ अशा भावनेतून प्रत्यक्ष जीवन जगणारे , प्राणी पक्ष्यांना रोज खाऊ घातल्याशिवाय ज्यांचा दिवस उगवलाच नाही असा करूणेचा सागर आज अचानक आटला तो कायमचा.. उद्योजकता संशोधन या कौशल्याचा केवळ स्वतःलाच लाभ न देता सर्व समाजाला लाभ मिळावा त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आणि समाधान पावणे हा त्यांच्या जीवनाच्या प्रवासाचा ठरलेला पथ होता. आहार आणि व्यायाम हा त्यांच्या सुदृढ जगण्याचा मंत्र होता.

यशस्वीपणे उद्योग सांभाळताना समाजकार्याची कास कधी सोडली नाही त्यामुळेच आणीबाणीमधेही संपूर्ण वाड्यातून त्यांनाच कैद झाली होती. आपल्या घराला समाज जीवनाचे आधार केंद्र बनवणारे, समाजाभिमुख आयुष्य जगणारे आणि अजून पुढे अनेक वर्षांसाठी समाज सुलभतेच्या कामांची स्वप्नं पाहणारे स्वयंसेवक, स्वातंत्र्य सेनानी, उद्योजक, संशोधक, सच्चे समाजसेवक आज पंचतत्वात विलीन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री वाडेकर, दोन मुले बिपिन आणि मिलिंद, सुना अर्चना, दर्शना, मुलगी रश्मी भातखळकर, जावई अतुल भातखळकर आणि नातवंडे कौशिक, सौमित्र आणि चिन्मय असा मोठा परिवार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,877चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा