32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषमुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी फक्त ३१ कोटी खर्च

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील १३० कोटींपैकी फक्त ३१ कोटी खर्च

Google News Follow

Related

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते पण आजमितीस एकूण जमा १३० कोटींपैकी फक्त ३१ कोटी खर्च करण्यात आले असून ९९ कोटी रक्कम शिल्लक असल्याची आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून आजमितीस १३० कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना ९ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी ४९३२ नागरिकांना २२ कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( मुख्य निधी) दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून ९९ कोटी रुपये शिल्लक आहे. दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास

‘आदित्य’ सूर्यावर जाणारच!

सीडीएस बिपिन रावत यांना लष्करी सन्मानात निरोप, १७ तोफांची दिली सलामी

शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईत एकाही शेतकऱ्याचा मृत्यू नाही

 

अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी ८ नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

◆ प्रत्येक दिवशी सरासरी ८ नागरिकांना अर्थसहाय्य

◆ वैद्यकीय कारणांसाठी २२ महिन्यात ४९३२ नागरिकांना २२ कोटींचे अर्थसहाय्य वितरित

◆ नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना ९ कोटींचे अर्थसहाय्य

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा