27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषआनंदाची बातमी; खाद्य तेलाच्या किमती येणार खाली

आनंदाची बातमी; खाद्य तेलाच्या किमती येणार खाली

Related

कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या सामान्य लोकांना एक दिलासा मिळणार आहे. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे दर कमी होणार आहेत. सरकारने या तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होणार आहेत. अर्थ मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार खाद्य तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यावरून २.५ टक्क्यावर करण्यात आले आहे. सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क ७.५ टक्क्यावरून २.५ टक्के करण्यात आले आहे.

या कपातीमुळे क्रूड पाम ऑइल, क्रूड सोया ऑइल आणि क्रूड सनफ्लॉवर ऑइलवरील प्रभावी शुल्क 24.75 टक्क्यांवर येईल, तर रिफाइंड पाम ऑइल, सोया ऑईल आणि सनफ्लॉवर ऑइलवरील प्रभावी शुल्क 35.75 टक्के असेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. नव्या आयात शुल्कातील घट पाहता तेलाच्या किंमती प्रत्येक लिटर मागे चार ते पाच रुपयांनी कमी होऊ शकतील, असे सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे (एसइए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भारतात पशुपालनामध्ये गाई नंबर वन!

चाकरमानी रंगला आरती, भजनाच्या रंगात

अफगाणिस्तानमध्ये कलाक्षेत्रावर अवकळा!

तरुणाच्या ‘फिल्मी’ नाट्यावर पोलिसांनी टाकला पडदा!

एसइए नुसार, नोव्हेंबर २०२० ते जुलै २०२१ दरम्यान वनस्पती तेलांची (खाद्य आणि अखाद्य तेल) एकूण आयात दोन टक्क्यांनी घटून ९६,५४,६३६ टनांवर आली आहे, जी मागील कालावधीत (नोव्हेंबर-ऑक्टोबर) ९८,२५,४३३ टन होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीआयसी) गेल्या महिन्यात कच्च्या सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमाशुल्क अर्ध्यावर आणून पुरवठा वाढवण्यासाठी ७.५ टक्के केले आहे. कच्चे तेल आणि सोन्यानंतर खाद्यतेल भारताच्या आयातीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा