26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरक्राईमनामातरुणाच्या 'फिल्मी' नाट्यावर पोलिसांनी टाकला पडदा!

तरुणाच्या ‘फिल्मी’ नाट्यावर पोलिसांनी टाकला पडदा!

Related

चित्रपटात काम देतो असे सांगून लोकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या बीकेसी पोलीसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या नावाने हा तरुण लोकांना चित्रपटात काम देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. लोकांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी हर्षद सकपाळ या २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा तरुण बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्सचे (बीसीए) शिक्षण घेत होता. सकपाळ हा मूळचा नाशिकचा असून त्याच्या नावे आधीपासून सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

धर्मा प्रोडक्शन हाऊसमधील एका कर्मचाऱ्याने एका पीडितांच्या सहाय्याने पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणाची तक्रार केली. पीडित व्यक्तीने २४ हजार गमावले. तपासादरम्यान हर्षद सकपाळ याने धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या नावाने बनावट लँडलाईन क्रमांक बनवून त्यावरून चित्रपटात काम करणाऱ्या इच्छुकांना फोन करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार सकपाळ याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

हर्षद सकपाळ याने प्रथम धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या नावाने बनावट लँडलाईन क्रमांक बनवला. त्यानंतर त्याने जवळपास एक लाख क्रमांक विकत घेतले. त्या सर्व क्रमांकावर बल्क डेटा मेसेज सर्विसच्या मदतीने तो संदेश पाठवत असे. खरेदी केलेले नंबर हे चित्रपटात काम करू इच्छित असणाऱ्यांचे होते. संदेशात तो स्वतः धर्मा प्रोडक्शन हाऊसमधील कर्मचारी असल्याचे भासवत असे. तसेच नवीन चित्रपटांसाठी प्रोडक्शन हाऊस अभिनेते, नर्तक आदी लोकांच्या शोधात आहे, असे संदेशात लिहिलेले असे. सकपाळ याला प्रोडक्शन हाऊसबद्दल खूप माहिती होती. त्यांच्या योजना, भविष्यात येणारे चित्रपट, कलाकार यांच्याविषयी त्याचा अभ्यास होता, असे पोलिसांनी सांगितले.

सकपाळ याला कॉम्प्युटरमधील उत्तम ज्ञान आहे. त्याने तयार केलेल्या बनावट क्रमांकाने कोणालाही फोन केल्यास त्यांच्या फोनवरील ट्रू कॉलर हे धर्मा प्रोडक्शनचे नाव दाखवत असे. सकपाळ हा तीन ते चार महिन्यांसाठी रशिया येथे जाऊन आला होता आणि तिथे काही हॅकर्सला भेटला होता, असे पोलिसांनी सांगितले. नोंदणी शुल्क, ऑडिशन शुल्क आदी बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा