31 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेषभारतात पशुपालनामध्ये गाई नंबर वन!

भारतात पशुपालनामध्ये गाई नंबर वन!

Related

भारतातील ग्रामीण गावांमध्ये गायीला पाळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येते. गायीच्या नंतर म्हैस पाळण्यासाठी लोकांचे प्राधान्य आहे. त्यापाठोपाठ ग्रामीण भागात इतर प्राणी म्हणजेच मेंढी, बकरी, डुक्कर यांचे पालन आणि नंतर कुक्कुटपालन केले जाते. मात्र, काही राज्यांमध्ये म्हैस पाळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येते. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पशु पालनामध्ये म्हशीचा क्रमांक पहिला येतो.

अनेक घरांमध्ये गुरे, म्हैस आणि इतर पाळीव प्राणी हे सगळेच उत्पादनाची साधने म्हणून असली तरी वरील राज्ये सोडल्यास इतर राज्यांमध्ये गायींची टक्केवारी ही जास्त आहे. नुकताच सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील ४८.५ टक्के घरांमध्ये गुरे आहेत तर २७.८ टक्के घरांमध्ये म्हशी आहेत. २१.९ टक्के घरांमध्ये मेंढी, बकरी, डुक्कर आदी प्राणी आहेत. १०.७ टक्के घरांमध्ये कुक्कुटपालन केले जाते. हे सर्वेक्षण १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत करण्यात आले होते.

हे ही वाचा:

भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम

चाकरमानी रंगला आरती, भजनाच्या रंगात

अफगाणिस्तानमध्ये कलाक्षेत्रावर अवकळा!

योगींचा निर्णय; मथुरेत मांस, मद्यपान वर्ज्य

हरियाणामध्ये पशुधन असलेल्या ३३ टक्के घरांच्या तुलनेत ९३ टक्के ग्रामीण कुटुंबांकडे म्हैस आहे. उत्तर प्रदेश राज्यात ५८ टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांकडे म्हैस आहे तर, ४३ टक्के कुटुंबांकडे गुरे आहेत. पंजाबमध्ये ३९ टक्के ग्रामीण घरांमध्ये गुरे आहेत तर, ५७.५ टक्के घरांमध्ये म्हैस आहे. गुजरात राज्यामध्ये ६३ टक्के घरांमध्ये म्हशी आहेत तर, ५५ टक्के ग्रामीण घरांमध्ये गुरे आहेत. आंध्र प्रदेशमध्ये १६ टक्के ग्रामीण घरांमध्ये गुरे आहेत आणि २० टक्के घरांमध्ये म्हशी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा