गुजरात पोलिसांनी अहमदाबादमध्ये वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या ५२ बांगलादेशी नागरिकांपैकी १५ जणांना हद्दपार केले आहे, ज्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. उर्वरित ३६ बेकायदेशीर स्थलांतरितांना १५ मार्चपर्यंत त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त भरत पटेल म्हणाले की, हे बेकायदेशीर स्थलांतरित वेश्याव्यवसाय रॅकेटमध्ये सहभागी होते आणि या बेकायदेशीर व्यवसायातून मिळणारे उत्पन्न बनावट कंपन्यांच्या बँक खात्यांद्वारे बांगलादेशला पाठवत होते.
ऑक्टोबरमध्ये , गुन्हे शाखेने चांडोला तलाव, दाणी लिमडा आणि शाह-ए-आलम सारख्या भागातून दोन अल्पवयीन मुलींसह ५२ बांगलादेशींना अटक केली होती. हे लोक २ ते १० वर्षे शहरात राहत होते.
पोलिस अधिकारी पटेल म्हणाले, ‘केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयाने, आम्ही या बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध पुरावे गोळा केले आणि ते बांगलादेशचे नागरिक आहेत आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून शहरात राहत असल्याचे सिद्ध केले.’
हे ही वाचा :
श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पुनःप्रतिष्ठापना महोत्सव
दिल्लीत जाऊन आदित्य ठाकरेंची ईव्हीएम, निवडणूक आयोगावर शंका!
क्रिकेटपटू ऋषभ पंतला वाचविणाऱ्या रजतने केले प्रेयसीसह विषप्राशन
शहरी नागरिकांसाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी
ते पुढे म्हणाले, तपासादरम्यान, हे बेकायदेशीर स्थलांतरित कोणत्याही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते का किंवा ते कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित होते का याचीही पडताळणी केली जात आहे. घुसखोरांच्या शोधासाठी विशेष मोहीमही राबवण्यात येत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.