24 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरविशेष२०२३ चं कालनिर्णय घेतलात का ? मग ही बातमी तुमच्या साठी

२०२३ चं कालनिर्णय घेतलात का ? मग ही बातमी तुमच्या साठी

दिन दर्शिकेला एक चूक भारी पडली...

Google News Follow

Related

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरूष अवमानवरून वादंग सुरू असल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याच तथाकथित अवमानाचा निषेध म्हणून विरोधी पक्षातील नेते मंडळी १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करणार आहेत. तसेच या वादंगात उडी घेत कालनिर्णय दिनदर्शिकेत छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेल्याचे समोर आले आहे. मात्र, ही चूक लक्षात येताच कालनिर्णयने तात्काळ खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

कालनिर्णय २०२३ च्या आवृत्तीमध्ये १६ जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. या पुढील कालनिर्णयच्या सर्व प्रतीमध्ये तसेच या पुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल, असे कालनिर्णयने त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे खुलासा केला आहे. धर्मवीर महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजपप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर मागतो. असा खुलासा कालनिर्णय केला आहे. तसेच कालनिर्णयने ही चूक पुन्हा न करण्याची हमीही दिली आहे.

हे ही वाचा :  ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात

अखेर कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांनीचं पूर्ण केली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात लोकांमध्ये संताप

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?

छपाई झालेल्या कॅलेंडरमध्ये सुधारणा करता येणार नसले तरी प्ले स्टोर ऍपमध्ये कालनिर्णयचे कॅलेंडर आहे. कमीत कमी तुम्ही त्यात बदल करू शकता. असा सल्ला काहींनी कालनिर्णय दिनदर्शिकेला दिला आहे. तर कालनिर्णय घेणं बंद करत असल्याचं सांगत मोबाईलमधून ऍप डिलीट करत असल्याचं सांगितले आहे. तर काही सदस्यांनी कालनिर्णय ने ही चूक जाणीवपूर्वक केल्याचे वाटते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,999अनुयायीअनुकरण करा
61,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा