29 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरविशेषआरोग्य विभागाची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहण्यास सांगणारा अधिकारी निलंबित

आरोग्य विभागाची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहण्यास सांगणारा अधिकारी निलंबित

डॉ. तबस्सुम खान यांनी युपीमध्ये सर्व आरोग्य विभागांवर हिंदीसह उर्दूमध्ये नावे लिहण्याचे आदेश दिले होते.

Related

प्राथमिक आरोग्य केंद्रांची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहिण्याचे आदेश उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. तबस्सुम खान असे या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आरोग्य महासंचालनालयात सहसंचालक प्राथमिक आरोग्य या पदावर होते. डॉ. तबस्सुम खान यांनी युपीमध्ये सर्व आरोग्य विभागांवर हिंदीसह उर्दूमध्ये नावे लिहण्याचे आदेश दिले होते. त्यांनी आदेश काढण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले नव्हते, अशी माहिती आहे.

डॉ.तबस्सुम खान यांनी राज्यातील सर्व आरोग्य सुविधांनी त्यांच्या आदेशाचे पालन केले की नाही याची खात्री करण्यासाठी सर्व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी पाहणी करण्यास सांगितले होते. याबद्दलही खान यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली नव्हती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युपी सरकारने त्यांना निलंबित केले आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, डॉ. तबस्सुम खान यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. सरकारी आदेश जारी करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून पाळली जात नव्हती.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

दरम्यान, उन्नावच्या मोहम्मद हारून यांनी तक्रार केली होती की राज्याची उर्दु ही दुसरी अधिकृत भाषा असूनही अनेक सरकारी विभाग उर्दू वगळत आहेत. या तक्रारीनंतर डॉ. तबस्सुम खान यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला हा आदेश जारी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा