उत्तराखंडच्या उधम सिंह नगर परिसरातून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी किच्छा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका मुस्लीम तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिफ असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करणे, तिचा व्हिडिओ बनवणे आणि तिला ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलीच्या कुटुंबीयांनी लिहिले आहे की, आरोपी काशिफ गेल्या दीड वर्षांपासून अकरावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला धमकावत आहे आणि तिच्यावर बलात्कार करत आहे. आरोपींनी प्रथम तिला बनावट नाव वापरून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, नंतर पुलभट्टाजवळील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्काराचा व्हिडिओ बनवला, नंतर तिला ब्लॅकमेल केले आणि तिचे शारीरिक शोषण केले.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरु केला. एसएसपी मणिकांत मिश्रा यांनी या प्रकरणात तात्काळ अहवाल नोंदवला आणि आवश्यक तपास केल्यानंतर आरोपी काशिफला अटक करून तुरुंगात पाठवले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा :
जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!
बांगलादेशी, रोहिंग्यांमुळे दिल्लीत वाढली गुन्हेगारी, मतदान नोंदणी, आरोग्य बिघडले
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्याकडून सरस्वती पूजेच्या शुभेच्छा; आश्चर्य व्यक्त!