राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी भाषण केले. मात्र त्यात वारंवार त्यांनी चीनची तुलना भारताशी केली. त्यावरून लोकसभेत चांगलीच खडाजंगी उडाली. सत्ताधारी पक्षाने राहुल गांधीवर टीका केली. त्यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या या भाषणाचा समाचार घेतला.
पात्रा म्हणाले की, राहुल गांधींना राहुल जिनपिंग म्हणावे असे वाटते. त्यांनी ४५ मिनिटांच्या भाषणात तब्बल ३४ वेळा चीनचा नामजप केला. कधीकधी असे वाटते की, राहुल गांधी म्हणत असावेत अगले जनम मुझे चायनिज ही किजो. राहुल गांधींनी सांगितले की, भारतात चीनच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. पण याबद्दल योग्य माहिती घ्यायला हवी. राहुल गांधीनी लक्षात घ्यावे ही आयातीची पद्धत कुणाच्या काळात निर्माण झाली? चीन आणि भारत यांच्यातील व्यापारात २५ पटीने तूट होती. २००४ ते २०१४ या काळात तुमच्या कालखंडात ते झाले होते. बँकिंग सेक्टरमध्ये फक्त १-२ कंपन्यांना मान्यता मिळत होती. पंतप्रधान मोदी यांनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत ५१ कोटी लोकांना कर्ज दिले आहे. जी काँग्रेस यूपीआय प्रणालीला विरोध करत होती, त्याद्वारे ५० कोटींचे व्यवहार झाले आहेत.
पात्रा म्हणाले की, राजाभिषेकाची पद्धत गांधी परिवारात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा तर शपथविधी झाला. राहुल गांधी आपल्याच देशाविरोधात बोलत असतात. ही हीनतेची भावना योग्य नाही. २०१४पर्यंत पंतप्रधानांच्या माध्यमातून निवडणूक आयुक्त नेमला जात असे, पण मोदींच्या काळात त्यात विरोधी पक्ष नेत्यांचाही समावेश करण्यात आला.
हे ही वाचा:
बांगलादेशी, रोहिंग्यांमुळे दिल्लीत वाढली गुन्हेगारी, मतदान नोंदणी, आरोग्य बिघडले
उद्योगपती धनंजय दातार म्हणतात, विकासाभिमुख अर्थसंकल्प
संभलमधील सरकारी तलावातील बेकायदेशीर मजार हटवली!
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ४५ मिनिटांत ३४ वेळा चीनचा उल्लेख केल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली. राहुल गांधी म्हणाले की, उत्पादन क्षेत्रात भारत चीनच्या तुलनेत मागे आहे. राहुल गांधी यांनी मोबाईल फोन दाखवत म्हटले की हा मेड इन इंडिया नाही तर असेम्बल्ड इन इंडिया आहे. चीन भारतात आहे कारण मेक इन इंडिया ही योजना अपयशी ठरली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचे खंडन केले आहे पण त्यांच्या विधानाचे खंडन लष्कराने केले आहे. चीन भारताच्या क्षेत्रात ४००० चौरस किमी आत शिरला आहे.
राहुल गांधींच्या या विधानावर भाजपाच्या खासदारांनी हल्लाबोल केला. किरण रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी यांना जे वाटते ते बोलतात त्यासाठी कोणतेही पुरावे देत नाहीत. ही अतिशय गंभीर बाब आहे.