34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषनौदलाला गुरुवारीच कळवले असते तर...

नौदलाला गुरुवारीच कळवले असते तर…

Google News Follow

Related

पूरस्थिती किंवा दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी जिल्हा प्रशासन पोरकेच ठरत असल्याचे कोकणात सध्या आलेल्या पुरामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आजही आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन याबद्दल अनास्था फारच दिसून येत आहे. नैसर्गिक आपत्तीप्रसंगी जिल्हा प्रशासनास नौदल, तटरक्षक दल व एनडीआरएफवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसून आले आहे. पुराने भीषण रूप घेतल्याचे सकाळी ९ वाजताच्यादरम्यान स्पष्ट झाले होते. त्यामुळे बचावकार्यासाठी जावे लागणार, अशी तयारी नौदलाच्या या पाचही ठिकाणच्या पथकांनी केली होती. पण प्रशासनाकडून मदतीची मागणीच आली नाही. त्यामुळेच आता प्रशासनाच्या एकूणच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.

पावसाळा सुरू झाल्यावर अनेक आपत्तीजनक घटना शहरात तसेच उपनगरात होत असतात.परंतु मदत तुकड्यांना पाचारण करतानाही होणारी दिरंगाई नागरिकांच्या जीवावर बेतणारी आहे. कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात. तशा त्या यंदाही होत्याच. पण रायगड व रत्नागिरीत पूर आल्यानंतर या तुकड्यांना मदतसाठी पाचारण करण्यास प्रशासनाकडून कमालीची हयगय करण्यात आली. त्यामुळे बचावकार्यातील अत्यंत महत्त्वाचा एक दिवस वाया गेला.

हे ही वाचा:

आमीषांना बळी पडलेले आता अडकले बदला’पुरात’

१७व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ५ जण मृत्युमुखी

लसीकरण झालेल्यांना रेल्वे खुली करा!

आपत्तीची दरड….

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी पूरपरिस्थिती भयंकर असताना ठाकरे सरकारने दिवसभरात कोणताच निर्णय घेतला नाही. सायंकाळी ६ नंतर नौदलाला राज्य सरकारकडून मदतीची विनंती करण्यात आली. त्यानंतर नौदलाची पाच पथके तातडीने रस्तामार्गे रत्नागिरीकडे रवाना झाले. परंतु तेथे पोहोचण्यासाठी गुरुवारची मध्यरात्र झाली. त्यामुळे बचावकार्य शुक्रवारी सुरु करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

ठाकरे सरकारकडून नौदलाला गुरुवारी सकाळीच कळवले गेले असते तर, बचावकार्य एक दिवस आधीच सुरू झाले असते. त्यामुळे पुरबाधित २०० हून अधिक नागरिकांचा बचाव करता आला असता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा