31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषतौकिर रझाने विष ओकले, आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचा आत्मा थरथर कापेल!

तौकिर रझाने विष ओकले, आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचा आत्मा थरथर कापेल!

वक्फ विधेयक विरोधात जयपूरमध्ये पार पडली बैठक

Google News Follow

Related

वक्फ दुरुस्ती विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर वाद सुरु आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षाकडून वारंवार विरोध केला जात आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या नावावर विरोधक राजकारण करताना दिसत आहेत. विरोधकांकडून मुस्लीम समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. यासाठी बैठका बोलविल्या जात असून सरकार विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी (१० नोव्हेंबर) वक्फ विधेयकाविरोधात जयपूरमध्ये मुस्लिमांचा मोठा मेळावा बोलावण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या तिथल्या मौलानानी माईक हातात घेतल्यावर सरकारच्या विरोधात विष ओकायला सुरुवात केली. या मेळाव्याला वादग्रस्त वक्तव्य करणारे इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष आणि इस्लामिक धार्मिक नेते तौकीर रझा यांना देखील बोलावण्यात आले होते. तौकीर रझा यांनी आपल्या भाषणात वादग्रस्त चिथावणीखोर वक्तव्य केले. आम्ही रस्त्यावर आलो तर तुमचा आत्मा थरथर कापेल आणि काही झाले तर त्याची जबाबदारी आमची राहणार नाही, असे रझा यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

२०२३ पर्यंत भारत- रशिया व्यापार १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल

संसदेत काँग्रेस अन रस्त्यावर मुस्लीम; वक्फ दुरुस्ती विधेयक रोखण्याचे प्रयत्न सुरू!

संजय उपाध्याय यांची रॅली ‘जनतेच्या साथीनं, विकासाच्या वाटेवर’

विक्रांत मॅसी हिंदुत्वाच्या बाजूने बोलला, मात्र हे चित्रपट प्रमोशनसाठी असल्याची टीका

मोदी सरकारच्या निर्णयामुळे संतप्त झालेले मौलाना तौकीर रझा यांनी मुस्लिमांना संघटित होऊन दिल्लीला वेढा घालण्याचे आवाहन केले. तौकीर रझा हे त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. मौलाना केंद्र  सरकार विरोधात म्हणाले, आम्ही जर रस्त्यावर उतारलो तर तुमचा आत्मा थरथर कापले, त्यानंतर जे काही होईल त्यांना सरकार जबाबदार असेल. आमचे तरुण डरपोक नाहीत.

ते पुढे म्हणाले, आम्ही आमच्या तरुणांवर नियंत्रण ठेवले आहे, ज्या दिवशी ते नियंत्रणाबाहेर जातील तेव्हा त्यांना रोखणे तुमच्या हातात नसल्याचे रझा म्हणाले. मेळाव्यात उपस्थित असलेल्या मुस्लिमांना आवाहन करत रझा म्हणाले, संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर तुम्हाला दिल्लीत यावे लागेल. तुमची ताकद दाखवावी लागेल, असे रझा म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा