25 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरविशेषविक्रांत मॅसी हिंदुत्वाच्या बाजूने बोलला, मात्र हे चित्रपट प्रमोशनसाठी असल्याची टीका

विक्रांत मॅसी हिंदुत्वाच्या बाजूने बोलला, मात्र हे चित्रपट प्रमोशनसाठी असल्याची टीका

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसी याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता विक्रांत मॅसी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मुलाखती देत आहे. विक्रांत मॅसीच्या अशाच एका मुलाखतीचा काही भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वसाहतवादाच्या प्रभावात अजूनही आपण अडकलेले आहोत. आजच्या हिंदूला आता त्यांच्याच देशात आपल्या अस्तित्वासाठी लढण्याची संधी मिळत आहे, असे मॅसी म्हणतो पण त्याचे हे विधान फक्त चित्रपट प्रसिद्धीपुरते आहे अशी टीका होऊ लागली आहे.

विक्रांत मॅसी याने सुशांत सिन्हा यांच्या पॉडकास्टवर एक मुलाखत दिली. या व्हिडिओमध्ये विक्रांत म्हणतो की, “आपण समजून घेतले पाहिजे की आपला देश अजूनही युवा म्हणजेच नवा आहे. स्वातंत्र्य मिळून फक्त ७६-७७ वर्षे झाली आहेत. आधी मुघल, मग डच, फ्रेंच आणि नंतर इंग्रज आले आणि शेकडो वर्षे त्यांनी राज्य केले. यानंतर जे स्वातंत्र्य मिळाले ते खरेच स्वातंत्र्य आहे का? इंग्रजांनी मागे टाकलेल्या वसाहतवादी प्रभावात आपण अडकून राहिलो. आजच्या हिंदूंना त्यांचे म्हणणे ठेवण्याची संधी मिळत आहे.”

यानंतर विक्रांत मॅसी याच्यावर सर्व बाजूने टीका होत आहे. विक्रांत अचानक कट्टर हिंदू असल्यासारखे वागत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे ढोंग असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांचे सत्य लपवता येत नाही. जोपर्यंत बॉक्स ऑफिसची गोष्ट आहे तोपर्यंत ते भक्त असल्याची बतावणी करणार, अशा आशयाच्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.

हे ही वाचा:

हिजबुल्लाच्या पेजर स्फोटामागे इस्रायलचं; नेतन्याहू यांची कबुली

काँग्रेसकडून २८ बंडखोरांवर कारवाईचा बडगा

न्यूटन, गॅलिलिओपेक्षाही समकालिन शिवाजी महाराज, महाराणाप्रताप बुद्धिमान, तेजस्वी

अफजलखान वध म्हणजेच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साजरा होणार शिवप्रताप सप्ताह

यापूर्वीही विक्रांत हा त्याच्या रामायणासंबंधित केलेल्या एका ट्वीटमुळे वादात अडकला होता. २०१८ मध्ये विक्रांतने संपादकीय व्यंगचित्र एक्सवर शेअर केले होते; ज्यामध्ये प्रभू श्रीराम आणि सीता यांचे संभाषण दाखविले होते. “मला समाधान आहे की, माझे अपहरण तुमच्या भक्तांनी न करता, रावणाने केले होते.” या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीने त्याचे विचार मांडत लिहिले, “अर्धवट शिजलेले बटाटे आणि अर्धवट विचारसरणीचे देशभक्त कायम त्रासदायक असतात.” यावरून टीका झाल्यानंतर विक्रांत याने हिंदू समुदायाची जाहीर माफीही मागितली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा