25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषलाडक्या बहिणींना प्रतिवर्षी २५ हजार २०० रु., कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ; भाजपचा...

लाडक्या बहिणींना प्रतिवर्षी २५ हजार २०० रु., कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ; भाजपचा संकल्प

गृहमंत्री अमित शहा यांनी केला जाहीरनामा प्रसिद्ध

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. आज (१० नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षाने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपाने या जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ असे नाव दिले आहे. महिला, आरोग्य, शिक्षण, युवा वर्गासाठीची आश्वासने या संकल्प पत्रात देण्यात आली आहेत.

काँग्रेसने यापूर्वीचं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या संकल्प पत्रात कोणते मुद्दे असणार आणि कोणत्या घटकाला काय लाभ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. भाजपाने आज प्रसिद्ध केलेल्या संकल्प पत्रात राज्याच्या लाडक्या बहिणींसह, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.

भाजपाचे संकल्प पत्रातील मुद्दे :

१.लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार ₹२,१०० , म्हणजेच वर्षाला ₹२५,२००
२. शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी शेतकरी सन्मान निधीत वाढ ₹१२,००० ऐवजी ₹१५,००० मिळणार आणि MSP वर २०% अनुदान देणार
३. प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण होईल, भाजप-महायुती अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल
४. वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान, महिन्याला ₹२१०० म्हणजेच वर्षाला ₹२५,२०० चा आधार
५. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार
६. १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार ₹१०,००० विद्यावेतन आणि २५ लाख रोजगार निर्मिती करणार
७. ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा ४५,००० गावांत पांदण रस्त्यांची बांधणी होणार
८. अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹१५,००० वेतन आणि विमा संरक्षण
९. वीज बिलात ३०% कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
१०. सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @२०२८ ‘ सादर करण्यात येईल
११. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य भाजपा करणार साकार
१२. मेक इन महाराष्ट्र बनवेल राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे बनणार एयरोस्पेस हब
१३. खतांवरील SGST कर मिळणार परत सोयबिनला प्रति क्विंटल किमान रु. ६००० /- भाव देणार
१४. २०२७ पर्यंत ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवणार ५०० बचतगटांसाठी १००० कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार
भाजप-महायुतीला मतदान करा
आणि विजयी करा
१५. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य
१६. महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी होईल उपलब्ध
१७. महाराष्ट्रात होणार कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
१८. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार १० लाख उद्योजक
१९. एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
२०. ओबीसी, एसबीसी, इडब्लुएस आणि वीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार
२१. युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणिवार्षिक आरोग्य तपासणी
२२. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन
२३. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार-सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी
२४. सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार फसव्या धर्मातराला आळा बसणार
२५. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार तसेच वन्यप्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार

हे ही वाचा : 

कॅनडातील हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक!

भिवंडीत ठाकरेंना धक्का, माजी आमदार रुपेश म्हात्रे शिंदे गटात सामील!

श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

एकगठ्ठा मतांचा जुगाड, तरीही पवार, पटोले धास्तावलेत का?

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा