25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषश्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

अद्याप कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील आज पुन्हा श्रीनगरच्या हरवान भागात रविवारी (१० नोव्हेंबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान दाचीगाम आणि निशातच्या वरच्या भागातील जंगल परिसरात सकाळी ९ च्या सुमारास चकमक सुरू झाली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे श्रीनगरच्या झाबरवान जंगल भागात संयुक्त पोलिस आणि सुरक्षा दलांची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ऑपरेशन दरम्यान गोळीबार झाला. पुढील तपशील देण्यात येईल, असे जम्मू-काश्मीरने ट्विट म्हटले.

हे ही वाचा : 

भिवंडीत ठाकरेंना धक्का, माजी आमदार रुपेश म्हात्रे शिंदे गटात सामील!

एकगठ्ठा मतांचा जुगाड, तरीही पवार, पटोले धास्तावलेत का?

हिंदू महिलेचे तुकडे करणाऱ्या गुलामुद्दीनला मुंबईत अटक

काँग्रेसने घोटाळे करण्यात स्वतःचेचं रेकॉर्ड्स मोडलेत

जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिकडच्या आठवड्यात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत, ज्यामुळे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत तर सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. शनिवारी जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा दल शोध मोहिमेवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा