31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषAsia Cup 2022: भारत- पाकिस्तान हाय व्होल्टेज ड्रामा आज रंगणार

Asia Cup 2022: भारत- पाकिस्तान हाय व्होल्टेज ड्रामा आज रंगणार

Google News Follow

Related

आशिया चषक स्पर्धा शनिवार, २७ ऑगस्ट रोजी सुरू झाली असून या स्पर्धेच आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये आज पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वीच चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

टी-२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला होता. आता त्या स्पर्धेनंतर आज हे दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे आता भारताला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

१९८४ पासून ते २०१८ पर्यंत एकूण १४ वेळा भारत पाकिस्तान यांच्यात लढत झाली आहे. यामध्ये १४ सामन्यांत आठ वेळा भारताने सामना जिंकला आहे तर पाच पाकिस्तानने सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. पण या आकडेवारीनुसार भारताचंच पारडं जड राहिल्याचं चित्र आहे.

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे तर पाकिस्तानच्या संघाची धुरा बाबर आझम याच्याकडे असणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दोन्ही संघांना मोठे धक्के बसले आहेत. या स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळू शकणार नाही, तर पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रीदी यालाही दुखापत झाली आहे त्यामुळे तोसुद्धा या स्पर्धेत खेळू शकणार नाही.

हे ही वाचा:

Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

Twin Tower Demolition: नोएडामधले ट्वीन टॉवर कसे पाडणार? वाचा सविस्तर

पाकिस्तान ‘बुडाला’ आणीबाणी जाहीर

भारत आणि पाकिस्तानचा सामना २८ ऑगस्ट रोजी दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता सामना सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन सामना थेट प्रक्षेपित केला जाणार असून हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदीवर पाहता येणार आहे. तर डिस्नी- हॉटस्टारवर चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा